1990 साली प्रदर्शित झालेला 'शेषनाग' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमात अभिनेत्री रेखाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या नेटकऱ्यांमध्ये या सिनेमातील एक किस्सा चर्चिला जातोय. या सिनेमाच्या वेळी दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्यामुळे रेखावर रडायची पाळी आली होती.
सरोज खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 'शेषनाग'. या सिनेमातील एक गाणं रेखावर चित्रीत करण्यात आलं होतं. हे गाणं सरोज खान डिरेक्ट करत होत्या. विशेष म्हणजे या गाण्यासाठी त्यांना फक्त ३ दिवसांचा वेळ देण्यात आला होता.
सरोज खान यांनी गाण्याची तयारी करण्यापूर्वी रेखाला भेटायची इच्छा व्यक्त केली. तिला भेटून या गाण्यातील काही गोष्टींवर त्यांना चर्चा करायची होती. मात्र, तब्येतीचं कारण देत रेखाने सिनेमाच्या सेटवर येण्यास नकार दिला. तीन दिवसानंतर रेखा सेटवर परतली मात्र यावेळीही तिने डान्सचा सराव करण्यास नकार दिला. इतकंच नाही तर 'आजचं शूट कॅन्सल करा' , असंही तिने सांगितलं. रेखाचं हे वर्तन पाहून सरोज खान तिच्यावर संतापल्या.
सरोज खानच्या रागाचा चढला पारा
''रेखाजी, मला वाटतंय तुम्हाला माझ्यापासून काहीतरी अॅलर्जी आहे. मी तुम्हाला डान्सच्या सरावासाठी बोलावते आणि तुम्ही येत नाहीत. शूटवर येताय पण सांगताय की तब्येत बरी नाहीये. तुमची इच्छा असेल तर निर्मात्यांशी बोलून तुम्ही कोरिओग्राफर चेंज करु शकता. तुम्ही जाऊन त्यांना सांगा की, तुम्हाला माझ्यासोबत काम करायचं नाहीये. काही तरी चुकतंय'', असं सरोज खान म्हणाल्या.
रेखाला कोसळलं रडू
सरोज खान यांची ही वाक्य ऐकल्यावर रेखाला रडू कोसळलं. रेखाच्या डोळ्यातलं पाणी पाहून सरोज यांनी 'मी काही चुकीचं बोलले', असं मला वाटत नाही, असं म्हणाल्या. त्यावर, 'मी करेन शुटिंग' असं म्हणून रेखा तिकडून निघून गेली.
Web Summary : On the set of 'Sheshnag', Rekha refused to rehearse, frustrating choreographer Saroj Khan. Khan confronted Rekha, suggesting a choreographer change. This made Rekha cry, but she ultimately agreed to shoot.
Web Summary : 'शेषनाग' के सेट पर रेखा ने रिहर्सल करने से इनकार कर दिया, जिससे कोरियोग्राफर सरोज खान निराश हो गईं। खान ने रेखा का सामना किया और कोरियोग्राफर बदलने का सुझाव दिया। इससे रेखा रो पड़ीं, लेकिन अंततः शूटिंग के लिए सहमत हो गईं।