Join us
Daily Top 2Weekly Top 5

“मी महिलेशी लग्न...”, महिला सेक्रेटरीबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान रेखा यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:54 IST

रेखा त्यांच्या महिला सेक्रेटरीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा प्रसिद्ध लेखकाने केला आहे. त्यानंतर रेखा यांनी मुलाखतीदरम्यान केलेलं एक विधान पुन्हा चर्चेत आलं आहे.

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. रेखा त्यांची महिला सेक्रेटरी फरझानासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा दावा लेखकाने केला आहे. यासर उस्मान यांनी रेखा यांच्यावरील बायोपिकमध्ये हा दावा केल्यानंतर त्यांनी भूतकाळात केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

रेखा यांचं नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं होतं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपमुळे बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगली होती. १९९० साली रेखा यांनी दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी विवाह केला होता. परंतु, लग्नानंतर सातच महिन्यांत अग्रवाल यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. त्यानंतर रेखा यांनी लग्न केलं नाही. २००४मध्ये सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी दुसरं लग्न करण्यावर भाष्य केलं होतं.

"सुपरहिट का ‘राज’ है”, ‘बाईपण भारी देवा’ आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत सोनालीची पोस्ट

सिमी गरेवाल यांनी रेखा यांना दुसऱ्या लग्नाबाबत विचारताच त्यांनी “तुला पुरुषाबरोबर म्हणायचं आहे का?” असं उत्तर दिलं होतं. त्यावर सिमी “हो, नक्कीच महिलेबरोबर नाही”, असं म्हणाल्या होत्या. यावर रेखा यांनी “का नाही?” असं उत्तर दिलं होतं. पुढे त्या “माझ्यानुसार, मी स्वत:शीच लग्न केलं आहे. मी माझा व्यवसाय आणि माझ्या प्रिय व्यक्तींशी लग्न केलं आहे,” असंही म्हणाल्या होत्या.

“राजकारण्याच्या मुलाबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते”, शर्लिन चोप्राचा खुलासा, म्हणाली, “तो सेक्ससाठी...”

पुढे सिमी “पुरुष महिलांना सुरक्षित असल्याची भावना देतात,” असं म्हणतात. सिमी यांना मध्येच थांबवत रेखा म्हणतात, “खरं तर नाही. याचा पुरुषाशी काही संबंध नाही. स्त्री कोणाबरोबर आहे, यावर ते अवलंबून आहे.” रेखा महिला सेक्रेटरीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या लेखकाच्या दाव्यानंतर त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

टॅग्स :रेखाबॉलिवूड