Join us

लिफ्टमध्ये शाहिद आणि सैफसोबत अडकल्यावर काय करणार? करिनाचं उत्तर ऐकून व्हाल थक्क....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 16:13 IST

सैफसोबत लग्न झाल्यावर शाहिदबाबती चर्चा मागे पडली. एकदा शाहिद आणि सैफबाबत करिनाने असं उत्तर दिलं होतं की, जे ऐकून इव्हेंटा होस्ट हैराण झाला होता.

करिना कपूरबॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी जी आपल्या अ‍ॅक्टिंगसोबतच फॅशन स्टेटमेंट आणि आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखली जाते. तिचं शाहिदसोबतच अफेअरही लग्नाआधी जोरदार चर्चेत होतं. आताही तिच्या अफेअरची चर्चा होते. पण सैफसोबत लग्न झाल्यावर शाहिदबाबती चर्चा मागे पडली. एकदा शाहिद आणि सैफबाबत करिनाने असं उत्तर दिलं होतं की, जे ऐकून इव्हेंटा होस्ट हैराण झाला होता.

करण जोहरच्या शोमध्ये करिनाला त्याने एक अजब जर-तरचा प्रश्न विचारला होता. करिनाला विचारण्यात आलं होतं की, जर लिफ्टमध्ये तू तुझा एक्स बॉयफ्रेन्ड शाहिद कपूर आणि पती सैफ अली खानसोबत अडकली तर तिचं रिअॅक्शन काय असेल? आता या प्रश्नावर बिनधास्त करिनाने तसंच बिनधास्त उत्तर दिलं.

बेबोने जराही वेळ न घालवता उत्तर दिलं की, 'हे मजेदार होईल. दोघांनी सोबत रंगूनसारख्या चांगल्या सिनेमात काम केलंय आणि दोघांचं एकमेकांसोबत चांगलं पटतही होतं. मी विचार करेन की, रंगून सिनेमात मी त्यांची हिरोईन का झाली नाही? आता बेबोचं हे उत्तर ऐकून करण जोहर हैराण झाला. 

दरम्यान, करिना कपूर आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. मात्र, यादरम्यानही ती तिचं काम संपवण्याच्या मागे लागली आहे. नुकतंच तिने आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. तसेच तिने सांगितले की, ती तैमूर पोटात असताना जाहिरातींच्या शूटींगमध्ये बिझी होती तर आता यावेळी ती सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ती नुकतीच सिनेमाचं शूटींग पूर्ण करून मुंबईत परतली.  

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान शाहिद कपूरबॉलिवूड