अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधले लोकप्रिय आणि आदर्श कपल आहेत. त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांनाच माहीत आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांचे बॉलिवूडमधील अफेअरचीही बरीच चर्चा होते. पण, जया बच्चन यांचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहितीये का? जया बच्चन आणि अमिताभ यांनी गुपचूप लग्न केलं होतं. मात्र, अमिताभ यांच्या आधी एका अभिनेत्यावर जया बच्चन यांचा जीव जडला होता.
जया बच्चन यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाबद्दल खुलासा केला होता. त्या अभिनेत्यासोबत जया बच्चन यांनी एकत्र कामंही केलं होतं. कॉफी विथ करणमध्ये जया बच्चन यांनी याबद्दल सांगितलं होतं. हा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र. जया बच्चन आणि धर्मेंद्र यांनी गुड्डी सिनेमात एकत्र काम केलं होतं. धर्मेंद्र हे जया बच्चन यांचे क्रश होते. त्यांना बघताच क्षणी जया बच्चन त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
त्या म्हणाल्या होत्या, "मला धर्मेंद्र आवडायचे. आमची पहिली भेट मी कधीच विसरू शकत नाही. ते येणार होते तेव्हा मी सोफाच्या मागे लपले होते. त्यांनी सफेद शर्ट आणि ट्राउजर घातली होती. ते एकदम ग्रीक गॉडसारखे दिसत होते. एवढा हँडसम मुलगा मी पहिल्यांदाच बघितला". धर्मेंद्र आणि जया बच्चन यांनी 'गुड्डी', 'छुपके छुपके', 'शोले' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षीच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेमकहाणी' सिनेमात ते एकत्र दिसले होते.