Join us

ऐश्वर्याच्या व्हॅनिटीबाहेर दारू पिऊन पडलेला सलमान; ‘देवदास’च्या शूटिंगदरम्यान काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 14:27 IST

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं अफेअर होतं. परंतु, काही कारणांमुळे त्यांच्यात ब्रेकअप झालं.

बॉलिवूडमधील किस्से, कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे अफेअर प्रचंड गाजले. त्यातलीच एक म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय. ‘हम दिल चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील जवळीक वाढली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु, नंतर काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झालं.

२००१ मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यातील नातं तुटलं. परंतु, सलमानला ऐश्वर्याबरोबरचं हे नातं कायम ठेवायचं होतं. 'देवदास' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने तसे प्रयत्न केले होते. अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये याबाबत उल्लेख केला आहे. 'देवदास' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा अनुपमा यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितला आहे. देवदास चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खान सेटवर हजर असायचा. ऐश्वर्या आणि सलमान यांच्यात तेव्हा दुरावा निर्माण झाला होता. ऐश्वर्याला सलमानपासून दूर जायचं होतं. परंतु, अभिनेत्याला ते मान्य नव्हतं.

संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष

'देवदास'च्या सेटवर ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर सलमान दारूच्या नशेत पडलेला असायचा. त्याला 'देवदास' चित्रपटात कामही करायचं होतं. पण, संजय लीला भन्साळींनी देवदास चित्रपटासाठी सलमानऐवजी शाहरुख खानची निवड केली. तेव्हापासून सलमान 'देवदास'च्या सेटवर रोज हजर असायचा, असं अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसलमान खानबॉलिवूड