Join us

अन् पहिल्या गर्लफ्रेन्डने अक्षय कुमारला रिजेक्ट केले...! कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 10:54 IST

अक्षयने स्वत: मजेदार किस्सा ऐकवला होता; पाहा व्हिडीओ

ठळक मुद्दे लवकरच अक्षयचा बेलबॉट, सूर्यवंशी हे सिनेमे रिलीज होणार आहेत. याशिवाय अतरंगी रे, बच्चन पांडे, पृथ्वीराज, रामसेतू या सिनेमातही तो दिसणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या सिनेमांची चर्चा होते, तसेच त्याचे पर्सनल लाईफही चर्चेत असते. ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा असो, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी किंवा मग पूजा बत्रा अनेकींसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. या अफेअरबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. पण कदाचित अक्कीच्या पहिल्या गर्लफ्रेन्डचा किस्सा तुम्हाला ठाऊक नसावा.तर या पहिल्या गर्लफ्रेन्डने अक्कीला रिजेक्ट केले होते. कारण काय तर अक्कीचा लाजाळू, संकोची स्वभाव. होय, त्याकाळात अक्की इतक्या लाजाळू स्वभावाचा होता की, तो गर्लफ्रेन्डला किस सुद्धा करू शकला नव्हता. अक्षयने स्वत: ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याबद्दल सांगितले होते.

अक्षय कुमार ‘हाऊसफुल 4’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचला होता. यादरम्यान त्याने हा मजेदार किस्सा ऐकवला होता. ‘ ती माझी पहिली गर्लफ्रेन्ड होती. मी तिला डेट करत होतो. मी तिला मुव्ही डेट्सवर घेऊन गेलो. अनेकदा तिला साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये डिनरला घेऊन गेलो. मद्रास कॅफेमध्ये तिला अनेकदा कॉफी पाजली. पण मी त्यावेळी इतका लाजाळू स्वभावाचा होतो की, मी तिचा ना कधी हात पकडला, ना तिला कधी किस करू शकलो. माझ्या या स्वभावामुळे ती मला सोडून गेली. तो माझ्यासाठी मोठा धडा होता. यानंतरच मी माझी पर्सनॅलिटी बदलण्याचा निर्णय घेतला होता,’ असे अक्षयने यावेळी सांगितले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अक्षयचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा अलीकडे  ओटीटीवर रिलीज झाला. मात्र प्रेक्षकांचा त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच अक्षयचा बेलबॉट, सूर्यवंशी हे सिनेमे रिलीज होणार आहेत. याशिवाय अतरंगी रे, बच्चन पांडे, पृथ्वीराज, रामसेतू या सिनेमातही तो दिसणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमार