Join us

VIDEO : अन् सौरव गांगुलीच्या सिक्युरिटी गार्ड्सनी आमिर खानला गेटवरूनच परत पाठवलं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:27 IST

होय, आमिर मोठ्या आशेनं सौरव गांगुलीच्या कोलकात्याच्या घरी पोहोचला होता. पण दादाच्या घराबाहेर तैनात सुरक्षा रक्षकांनी आमिरला अक्षरश: हुसकावून लावलं.

ठळक मुद्देसध्या आमिर खान त्याच्या घटस्फोटामुळं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खाननं आपली दुसरी पत्नी किरण रावला लग्नाच्या  घटस्फोट दिला.

सौरव गांगुलीच्या ( Sourav Ganguly ) घराबाहेरच्या सिक्युरिटी गार्ड्सनी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानला (Aamir Khan)आला तसाच हुसकावून लावलं, असं कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. होय, आमिर मोठ्या आशेनं सौरव गांगुलीच्या कोलकात्याच्या घरी पोहोचला होता. पण दादाच्या घराबाहेर तैनात सुरक्षा रक्षकांनी आमिरला अक्षरश: हुसकावून लावलं होतं. अद्यापही या गोष्टीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर बातमीसोबतचा हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.तर ही घटना आहे 2009 सालची. आमिर खान त्याच्या ‘थ्री इडियट्स’ या सिनेमाचं प्रमोशन करत होता. याच प्रमोशनल इव्हेंटचा भाग म्हणून आमिर दादाला भेटायला त्याच्या कोलकात्याच्या घरी गेला होता. अर्थात वेगळ्या अवतारात. मी दादाचा खूप मोठा चाहता आहे, असं त्यानं दादाच्या घराबाहेर उभ्या सुरक्षा रक्षकांना सांगितलं आणि त्यांनी आमिरला अक्षरश: गेटवरूनच हुसकावून लावलं.

आमिर एका चाहत्याच्या वेशात दादाच्या घरी पोहोचला होता. त्याचा तो अवतार इतका वेगळा होता की, त्याला कोणाला ओळखताच आलं नव्हतं. हा आमिरचा प्रमोशनचा एक फंडा होता. याचा व्हिडीओही शूट केला गेला होता. का कुणास ठाऊक पण सध्या हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

यानंतर आमिर आपल्या घरी आल्याचं सौरवला कळलं तेव्हा त्यानं, स्वत: आमिर व त्याची पत्नी किरण रावसोबत आपल्या घरी डिनरसाठी बोलवलं होतं. या डिनरचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते.सध्या आमिर खान त्याच्या घटस्फोटामुळं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खाननं आपली दुसरी पत्नी किरण रावला लग्नाच्या  घटस्फोट दिला. 15 वर्षाच्या संसारारानंतर हे जोडपं विभक्त झालं. आमिरच्या वर्कफं्रटबद्दल सांगायचं तर आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात तो करिना कपूरसोबत दिसणार आहे.  

टॅग्स :आमिर खानसौरभ गांगुली