कमल हसन (kamal haasan) हे त्यांच्या करिअर आणि पसर्नल लाईफला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आज आम्ही तुम्हाला 'पुन्नागई मन्नन' सिनेमा दरम्यान घडलेला एक किस्सा सांगणार आहोत, जर फार कमी लोकांना माहिती असेल. या सिनेमात त्यांच्यासोबत अभिनेत्री रेखा (Rekha) देखील होत्या. 'पुन्नागई मन्नन'च्या शूटिंग दरम्यान कमल हसन यांनी जबरदस्ती किस केल्याचा आरोप रेखा यांनी केला होता.
रेखा या केवळ त्यावेळी 16 वर्षांच्या होत्या. त्या सांगतात, या चित्रपटात हे दृश्य अश्लील वाटले नाही. कारण या चित्रपटाच्या कथानकाची ती गरज होती.
रेखा म्हणाला होत्या, कमल हासन आणि या चित्रपटाच्या टीमला या दृश्याबद्दल पूर्णपणे कल्पना होती. हा चित्रपट त्या काळात सुपरहिट झाला होता. या चित्रपटामुळे मला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण मी एक नक्कीच सांगेन, या चित्रपटात किसिंग दृश्य द्यायला मी कधीच होकार दिला नव्हता. त्यांनी मला काही कळायच्याआधीच या दृश्याचे चित्रीकरण केले. मी त्यानंतर हे दृश्य पाहाण्याची हिंमत केली नाही.