Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bhoot Bangla Runtime: ६३ सीन्स कट झाले! आता काय असणार 'भूत बंगला'चा रनटाइम? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:11 IST

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' (Bhooth Bangla) या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून, सेन्सॉर बोर्डाने (CBFC) काही बदलांसह चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. याशिवाय 'भूत बंगला' चित्रपट किती लांबीचा असणार? याचीही अपडेट समोर आली आहे.

सेन्सॉर बोर्डाने या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला 'UA 16+' प्रमाणपत्र दिले आहे. याचा अर्थ १६ वर्षांखालील मुलांनी हा चित्रपट पालकांच्या मार्गदर्शनाखाली पाहणे अपेक्षित आहे. बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेतला होता, त्यानंतर निर्मात्यांनी त्यात आवश्यक बदल केले आहेत. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सेन्सॉरच्या बदलांप्रमाणे एकूण ६३ सीन्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सिनेमाची लांबी १० मिनिटांनी कमी झाली आहे. 'भूत बंगला' सिनेमाचा रनटाईम २ तास ४४ मिनिटं इतका असणार आहे.

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी यापूर्वी 'हेरा फेरी', 'भूल भुलैया' आणि 'गरम मसाला' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे 'भूत बंगला'कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात अक्षयसोबत अनेक दिग्गज कलाकार विनोदी भूमिकेत दिसणार आहेत. अनेक बदलांनंतर आता हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल, राजपाल यादव, असरानी, वामिका गब्बी आणि तब्बू प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सर्वांना 'भूत बंगला'ची उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Bhooth Bangla' runtime cut by 63 scenes! New length revealed.

Web Summary : Akshay Kumar and Priyadarshan's 'Bhooth Bangla' faced censor cuts; 63 scenes removed. The UA 16+ certified horror-comedy now runs for 2 hours and 44 minutes. Expectations are high for this reunion.
टॅग्स :अक्षय कुमारपरेश रावलबॉलिवूड