Join us
Daily Top 2Weekly Top 5

असं काय घडलं होतं की, शाहरुख खानने गौरीला बुरखा घालायला, नमाज पढायला सांगितलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 19:39 IST

शाहरुख खान आणि गौरी खान बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

शाहरुख खान आणि गौरी खान बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला आता २८ वर्ष पूर्ण झाली आहेत. एवढी वर्षं हे दोघे प्रेमाने एकत्र संसार करत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी शाहरुखने गौरीला सर्व नातेवाईकांच्या समोर गंमतीत बुरखा घालायला आणि नमाज पठण करायला सांगितलं होतं.

शाहरुख खानने फरीदा जलाल यांच्या चॅट शोमध्ये सांगितले होते की, शाहरुख आणि गौरी यांचे लग्न झाले. लग्नंनंतर एक रिसेप्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाला गौरीच्या घरचे देखील सर्व उपस्थित होते. तेव्हा गौरीच्या काही पाहुण्यांमध्ये हळू-हळू काही कुजबूज चालू होती.ती चर्चा शाहरुखच्या कानापर्यंत आली. आता गौरीला हे लोक धर्म बदलायला लावतील, तिचे नाव देखील बदलतील, तिला बुरखा घालायला लावतील अशी हळुहळू कुजबूज चालू होती.

शाहरुखने जेव्हा ही कुजबुज समजली तेव्हा तो अचानक खूप सीरियस झाला आणि गौरीला ओरडू लागला. गौरी चल लवकर बुरखा घाल आणि नमाज पढ शाहरुख अचानक असा बोलल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. अरे आपण आताच चर्चा केली आणि हा मुलगा लगेच तिला धर्म आणि नाव बदलायला सांगतो आहे. हे लोक असे असतात. गौरी देखील काही वेळ शॉक झाली शाहरुख बरा तर आहे ना ? असं का बोलत आहे. दोन मिनिटे गेल्या नंतर शाहरुख शांत झाला आणि हसू लागला. तेव्हा सर्वाना समजले शाहरुख गंमत करतो आहे. शाहरुख तेव्हा गमंतीत गौरीला म्हणाला होता की तुझे नाव आता आयशा असेल आणि तू नेहमी बुरखा घालूनच बाहेर पडायचे. या नंतर शाहरुखने संगितले की आपण इतक्या पुढारलेल्या समाजात राहतो आणि असा विचार करतो हे अत्यंत चुकीचे आहे.

वास्तविक गौरीने धर्म बदललेला नाही. दोघेही आपापल्या धर्माचे पालन करत सुखात नांदत आहेत. गौरीसाठी शाहरुख पाच वर्षं हिंदू बनून राहिला होता, असेही काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :शाहरुख खानगौरी खान