Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे वेब सीरिज, का वाढतेय दिवसेंदिवस क्रेझ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 15:16 IST

वेब सीरिजची वाढती क्रेझ पाहता भविष्यात मोठा चाहता वर्ग वेब सीरिजकडे वळलेला असेल, यात तिळमात्र शंका नाही. आज आपण वेब सीरिज काय आहे आणि त्याची क्रेझ का सातत्याने वाढत आहे याबाबत जाणून घेऊया...

-रवींद्र मोरेगेल्या दोन वर्षाचा विचार केला तर डिजिटल प्लेटफॉर्मवर वेब सीरिजने धमाल माजवली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कथानकासोबत प्रयोग होत आहे आणि नवनवीन कंटेंट प्रेक्षकांना अनुभवयास मिळत आहे. टीव्ही पेक्षा वेगळा येथे सासु-सुनेचा बोरिंग ड्रामा नसतो आणि दीर्घ ब्रेकही नसतात. मात्र अजूनही प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग आहे जो वेब सीरिजबाबत अज्ञान आहे. पण वेब सीरिजची वाढती क्रेझ पाहता भविष्यात हा वर्ग वेब सीरिजकडे वळलेला असेल, यात तिळमात्र शंका नाही. आज आपण वेब सीरिज काय आहे आणि त्याची क्रेझ का सातत्याने वाढत आहे याबाबत जाणून घेऊया...* काय आहे वेब सीरिज

चित्रपट आणि टीव्ही सीरियल पेक्षा वेब सीरिजमध्ये ८ ते १० एपिसोड असतात. ही सीरिज वेगवेगळ्या कथानकावर आधारित असते. एक एपिसोड २५ ते ४५ मिनिटापर्यंत असतो. या वेब सीरिज डिजिटल प्लेटफॉर्मवर बऱ्याचदा एकसोबत लॉन्च केल्या जातात, तर काहीवेळेस दर आठवड्याला एक एपिसोड लॉन्च केला जातो.* कंटेंटमध्ये नाविन्यताटीव्ही चॅनल्स किंवा चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर कथानक सहसा एकच विषयाच्या अवतीभोवती फिरत असतो. मात्र वेब सीरिजमध्ये कंटेंट सर्वात मोठे हत्यार आहे. येथे निर्माता-दिग्दर्शकांना बोल्ड कंटेंटपासून अशा बºयाच विषयांवर सीरिज बनवायला मुभा असते आणि हिच मुभा साधारपणे चित्रपट किंवा सीरियल्समध्ये नसते. खासकरुन तरुणांसाठी हे एक उत्कृष्ट माध्यम आहे जे नाच-गाणे आणि फॅमिली ड्रामाव्यतिरिक्त हटके कथानक पाहु इच्छितात.* सेन्सॉरची कात्री नाही

चित्रपटात जेव्हाही बोल्ड किंवा अ‍ॅडल्ट कंटेंट असतो तेव्हा निर्माता आणि डायरेक्टरला सेन्सॉर बोर्डाला तोंड द्यावे लागते. मात्र डिजिटल प्लेटफॉर्मवर सेन्सॉर सारखे काहीही नाही. गेल्यावर्षी अनुराग कश्यपची सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज खूपच चर्चेत होती. लवकरच हिचा दुसरा भागही येत आहे. अनुराग कश्यपने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हाही एखादा चित्रपट बनविला तर त्यानंतर त्याला एका महिन्यापर्यंत सेन्सॉर बोर्डाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र वेब सीरिज झाल्यानंतर त्याला फ्री आणि रिलॅक्स वाटत असते.* सातत्याने वाढत आहे मागणी

टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या स्वस्त इंटरनेटमुळेदेखील प्रेक्षकांसाठी वेब सीरिज पाहणे अजून सोपे झाले आहे. सध्याच्या काळात तरुणांकडे वेळेची कमतरता नाहीय, अशातच तो आपल्या स्मार्टफोनवर वेब सीरिज कधीही पाहू शकतो.* बॉलिवूड सेलेब्सचाही कलवेब सीरिजची वाढती लोकप्रियता पाहता बॉलिवूड स्टार्सचाही कल आता वेब सीरिजकडे झुकताना दिसत आहे. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, ऋचा चड्ढा, विवेक ओबेराय, अली फजल आणि पंकज त्रिपाठी आदी दिग्गज कलाकारांनी वेब सीरिजच्या माध्यमातून खूपच लोकप्रियता मिळविली आहे. केवळ स्टारच नव्हे तर बॉलिवूड डायरेक्टर्सदेखील वेब सीरिजकडे वेगाने वळताना दिसत आहेत. 

 

टॅग्स :बॉलिवूडसॅक्रेड गेम्सलस्ट स्टोरीजमिर्झापूर वेबसीरिज