War 2 सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. सलमान खानचा 'टायगर ३' सिनेमा जेव्हा रिलीज झालेला तेव्हा त्याच्याशेवटी हृतिक रोशनच्या War 2 ची घोषणा करण्यात आली होती. हृतिक पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज आहे. War 2 मध्ये यावेळी हृतिकसोबत RRR फेम ज्यु. एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अशातच War 2 विषयी मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे War 2 मध्ये बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
War 2 मध्ये झळकणार ही अभिनेत्री
हृतिक रोशनच्या War 2 बद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे War 2 मध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर थिरकताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रद्धा कपूर War 2 मध्ये विशेष गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. सध्या तरी श्रद्धाशी याविषयी प्राथमिक बोलणी सुरु आहेत. अजूनतरी यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलं नाहीय. तरी 'स्त्री २' मुळे चर्चेत असलेली श्रद्धा कपूर War 2 मध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
War 2 सिनेमाविषयी
'ये जवानी है दिवानी', 'ब्रम्हास्त्र' फेम अयान मुखर्जी War 2 सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. War च्या पहिल्या भागाला मिळालेल्या सुपरहिट यशानंतर हृतिक रोशन पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक यावेळी सिनेमात ज्यु. एनटीआरसोबत भिडताना दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२५ ला रिलीज होणार आहे. 'टायगर', 'पठाण' नंतर 'वॉर' सिनेमाही यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा महत्वाचा भाग आहे. 'वॉर २' रिलीज झाल्यावर आलिया भट-शर्वरीच्या 'अल्फा' सिनेमा स्पाय युनिव्हर्समध्ये जोडला जाणार आहे.