Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालिका वधू फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक, आयसीयूत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:11 IST

टीव्ही मालिका 'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक आला आहे.

टीव्ही मालिका 'बालिका वधू' फेम अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना ब्रेन स्ट्रोक आला आहे.त्यानंतर त्यांना  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी त्यांना 2018 ब्रेन स्ट्रोक आला होता. शूटिंग दरम्यान त्या पडल्या होता. त्यानंतर तिच्यावर काही काळ उपचार केले गेले आणि त्या हळू हळू बऱ्या झाल्या.

ज्यूस पिताना आला ब्रेन स्ट्रोक 

मीडिया रिपोर्टनुसार, सुरेखा या सकाळी यारी रोड इथल्या घरी ज्यूस पीत होत्या त्या दरम्यान त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. यानंतर लगेचच त्यांना क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, नर्सने बोलताना उल्लेख केला की, सुरेखा या आर्थिक संकटात आहेत त्यांनी बॉलिवूडकडून आणि टीव्ही कलाकारांकडून मदत मागितली आहे. मनीष मुंद्रा, अनुभव सिन्हा, अमित शर्मा या चित्रपट निर्मात्यांनी त्यांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्थिक अडचण नसल्याचा दावासुरेखा यांच्या मॅनेजरनच्या म्हणण्यानुसार, त्या कोणत्याच आर्थिक संकटात नाहीत. जर कुटुंबीयांना तशीच गरज लागली तर ते त्यांच्या सहकार्यशी बोलतील.

टॅग्स :टेलिव्हिजन