Join us

विवेक ओबेरॉयचा भाऊही आहे प्रसिद्ध अभिनेता, मोठा खुलासा करत म्हणाला- "आमचे संबंध चांगले नाहीत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:04 IST

फार कमी जणांना ठाऊक असेल की विवेक ओबेरॉयचा भाऊही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने हृतिक रोशनच्या फायटर सिनेमात काम केलंय

अभिनेता विवेक ओबेरॉयला एक भाऊ असून तो सुद्धा एक अभिनेता आहे फार कमी लोकांना माहित असेल. विवेक ओबेरॉयच्या भावाचं नाव आहे अक्षय. पण नुकत्याच एका मुलाखतीत अक्षयने विवेकबद्दल एक मोठं विधान केलंय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेता अक्षय ओबेरॉयने विवेक ओबेरॉयशी असलेल्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ते दोघे चुलत भाऊ असले, तरी त्यांच्यात कोणतेही जवळचं नाते नाही, असे त्यांनी सांगितले.

अक्षय-विवेकच्या नात्यामध्ये दुरावा

अक्षय ओबेरॉयने नुकतंच फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "विवेक ओबेरॉय माझा चुलत भाऊ आहे, पण आम्ही एकमेकांच्या फार जवळ नाही. आमच्या दोघांमध्ये चांगले नाते नाही. इंडस्ट्रीमध्ये खूप कमी लोकांना हे माहीत आहे की आम्ही दोघे चुलत भाऊ आहोत. पण मी माझ्या करिअरमध्ये कधीही विवेकच्या नावाचा वापर केला नाही, कारण आमच्यात कधीही खरं नातं नव्हतं, ज्याचा मी फायदा घेऊ शकेन."

याबद्दल दुःख व्यक्त करत अक्षय म्हणाला, ‘मला या गोष्टीचे दुःख आहे की आम्ही दोघे भाऊ असूनही आमच्यात एक चांगलं नातं निर्माण झाले नाही.’ अक्षयने असेही सांगितले की, त्याला या गोष्टीचा अभिमान आहे की तो या कुटुंबाचा एक भाग आहे, पण त्याला विवेकसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही याचं वाईट वाटतं.

अक्षय ओबेरॉयने ‘ब्लॅकमेल’ आणि ‘पिज्जा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय हृतिक रोशनसोबत 'फायटर' सिनेमात काम केलंय. तर विवेक ओबेरॉयने ‘साथिया’, ‘कंपनी’, शूटआऊट अॅट लोखंडवाला सारख्या चित्रपटांमध्ये काम करून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. अक्षय आणि विवेकच्या नात्याबद्दल गोष्ट समोर आल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.

टॅग्स :विवेक ऑबेरॉयबॉलिवूडहृतिक रोशन