'द काश्मीर फाईल्स' फेम प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून परदेश दौऱ्यावर असलेले विवेक अग्निहोत्री नुकतेच भारतात परतले आहेत. मायदेशी परतताच त्यांनी सर्वात आधी रणवीर सिंग आणि आदित्य धर यांचा बहुचर्चित 'धुरंधर' (Dhurandhar) हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर विवेक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून 'धुरंधर' टीमचे कौतुक केले आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'धुरंधर' पाहिल्यानंतर त्यांचे मन सुन्न झाले आहे. ते लिहितात, "आदित्य खूपच भारी! दोन महिने भारताबाहेर राहिल्यानंतर मायदेशी परतल्यावर मी 'धुरंधर' पाहिला आणि खरंच सांगतो, मी थक्क झालो आहे. अशा प्रकारचा चित्रपट बनवण्यासाठी खूप हिंमत लागते. हा केवळ चित्रपट नाही, तर एक जागतिक दर्जाचा अनुभव आहे. मला तुझा आणि तुझ्या टीमचा अभिमान वाटतो."
अग्निहोत्री पुढे लिहितात, ''चित्रपटसृष्टीत असे धाडसी चित्रपट क्वचितच किंवा योगायोगानेच बनतात. बॉलिवूडच्या जुन्या साच्यातील चित्रपटांना छेद देऊन काहीतरी नवीन आणि भव्य पडद्यावर मांडल्याबद्दल आदित्य धर तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रत्येत छोट्या छोट्या कलाकाराने चांगलं काम केलं आहे. त्यामुळे हा संपूर्ण सिनेमा फक्त लेखक- दिग्दर्शकाचा आहे.'' अशी दीर्घ पोस्ट लिहून विवेक अग्निहोत्रींनी शेवटी दिग्दर्शक आदित्य धरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज असलेल्या 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. ७५० कोटींहून अधिक कमाई करत हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत जास्त कमाई करण्याऱ्या चित्रपटांमध्ये सहभागी झाला आहे. आता विवेक अग्निहोत्री यांच्यासारख्या दिग्दर्शकाने या चित्रपटाची स्तुती केल्यामुळे 'धुरंधर'ची टीम नक्कीच आनंदात असेल यात शंका नाही.
Web Summary : Vivek Agnihotri, after watching 'Dhurandhar,' lauded director Aditya Dhar's courageous filmmaking. He praised the film's global appeal and the performances of the entire cast, acknowledging its impact and innovative approach to Bollywood cinema. The film has grossed over ₹750 crore.
Web Summary : विवेक अग्निहोत्री ने 'धुरंधर' देखने के बाद निर्देशक आदित्य धर की साहसी फिल्म निर्माण की सराहना की। उन्होंने फिल्म की वैश्विक अपील और पूरे कलाकारों के प्रदर्शन की प्रशंसा की, बॉलीवुड सिनेमा के लिए इसके प्रभाव और नवीन दृष्टिकोण को स्वीकार किया। फिल्म ने ₹750 करोड़ से अधिक की कमाई की है।