Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘विवाह’ सिनेमातील ‘छुटकी’ आठवते? आता पाहाल, तर पाहातच राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 15:51 IST

दिसते इतकी हॉट आणि ग्लॅमरस ...!!

ठळक मुद्देवयाच्या चौथ्या वर्षी अमृता प्रकाशने अ‍ॅक्टिंगची सुरुवात केली होती. केरळच्या एका लोकल ब्रँडच्या जाहिरातीत ती सर्वप्रथम झळकली होती.

बॉलिवूडचा ‘विवाह’ हा शाहिद कपूरअमृता रावचा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल. शाहिद आणि अमृताच्या निरागस प्रेमाची आणि  नात्याची ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे, ते त्याचमुळे. या चित्रपटात शाहिद आणि अमृताशिवाय एक बालकलाकारही होती. तिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ती कोण तर अमृता रावच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारणारी छुटकी अर्थात अमृता प्रकाश. चित्रपटातील सावळ्या रंगाच्या छुटकीने अनेकांची मने जिंकली होती. आज ही छुटकी कुठे आहे, काय करते, कशी दिसते, हे तुम्हाला ठाऊक आहे? चित्रपटातील छुटकी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. आयुष्यात आता ती जशी दिसते हे पाहून तुम्हीसुद्धा तिला ओळखू शकणार नाही.

छोटी छुटकी प्रकाश आता  मोठी झाली आहे, तेवढीच  सुंदर, बोल्ड आणि ग्लॅमरस सुद्धा झाली आहे. 

वयाच्या चौथ्या वर्षी अमृता प्रकाशने अ‍ॅक्टिंगची सुरुवात केली होती. केरळच्या एका लोकल ब्रँडच्या जाहिरातीत ती सर्वप्रथम झळकली होती.

यानंतर ती अनेक जाहिरातींत झळकली. डाबर, रसना, सनसिल्क अशा मोठ् मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत तिला संधी मिळाली.

फॉक्स किड्स सारख्या अनेक कार्टून टीव्ही शोजमध्ये अँकर म्हणूनही तिने काम केले. पाठोपाठ अनेक मालिकांही केल्यात.

‘तुम बिन’ या हिट चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. यानंतर अनेक चित्रपटांत तिने सहाय्यक भूमिका साकारल्या. 2006 मध्ये आलेल्या ‘विवाह’ सिनेमात तिची भूमिका छोटी असली तरी आपल्या अभिनयाने तिने छाप पाडली.

कोई मेरे दिल में है, एक विवाह ऐसा भी, वी आर फॅमिली, ना जाने कबसे या चित्रपटातही तिने लहान मोठ्या भूमिका केल्या. काही मल्याळम सिनेमांतही तिने काम केले.

पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला. मुंबई विद्यापीठातून तिने कॉमर्स आणि बिजनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. 

 

टॅग्स :बॉलिवूडअमृता रावशाहिद कपूर