विशाल मल्होत्रा (Vishal Malhotra) हिंदी सिनेसृष्टीतला लोकप्रिय चेहरा. 'इश्क विश्क' सिनेमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. एकेकाळी तो अनेक सिनेमांमध्ये साईड रोल्समध्ये दिसायचा. मात्र नंतर त्याने सिलेक्टिव्ह भूमिका करणं सुरु केलं. इथेच त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. नुकतंच त्याने एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील चढ उतारावर भाष्य केलं आहे.
हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत विशाल मल्होत्रा म्हणाला, "एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसने मला भूमिका ऑफर केली होती. मी त्यांना म्हणालो की मला हे करायचं नाही. स्क्रिप्टमध्ये जो दुसरा चार सीनचा रोल आहे तो मला द्या. मी त्यात काहीतरी वेगळं करेन. पण त्यांनी मला तो रोल दिला नाही. यानंतर माझा इगो दुखावला. सगळा खेळ इगोचाच आहे."
तो पुढे म्हणाला, "जर तुम्ही कोणत्या पक्षात आहात आणि एखाद्या पॉवरफुल व्यक्तीला भेटून त्याला म्हणालात की तुम्ही खूप चांगलं काम करता. नंतर तो तुम्हाला म्हणाला, 'कोण तू?' एक ड्रिंक घेऊन ये. बास..तिथेच सगळी गडबड होते. मी दोन वर्ष घरातच रिकामा बसून होतो. मला खूप वाईट वाटत होतं. मी घाबरलेलो. पण या १० वर्षात मी हेही शिकलो की कठीण प्रसंगी तुम्ही स्ट्राँग बनता आणि काहीतरी वेगळं करण्याचा विचार करता."
विशाल मल्होत्राने अभिनेता, होस्ट म्हणून काम केलं आहे. 'हिप हिप हुर्रै' कार्यक्रमात त्याने सूत्रसंचालन केलं होतं. 'इश्क विश्क','सलाम-ए-इश्क','काल','डोर','किस्मत कनेक्शन' यांसारख्या सिनेमांमध्ये त्याने भूमिका साकारली. 'एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा' या शोमध्ये त्याने मोना सिंहसोबत सूत्रसंचालन केलं. 'कुछ तो लोग कहेंगे' मालिकेत तो दिसला.