Join us

Virat Anushka : विराट अनुष्काचा ऋषिकेश दौरा, १०० संतांसाठी भंडाऱ्याचे आयोजन, सोशल मीडियावर होतेय कौैतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 13:36 IST

कोहली कुटुंब सध्या ऋषिकेश दौऱ्यावर असून सुट्टीचा आनंद घेत आहेत.

Virat Anushka :  भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या ऋषिकेश दौऱ्यावर आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी लेक वामिकासह स्वामी दयानंद गिरी यांच्या आश्रमाला भेट दिली. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. यानंतर विराट अनुष्काने सर्व सुमारे १०० संतांसाठी भोजनाची व्यवस्था केली.याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोहली कुटुंब सध्या ऋषिकेश दौऱ्यावर असून सुट्टीचा आनंद घेत आहेत. तिघांनी यावेळी ट्रेकिंगचाही अनुभव घेतला. तर स्वामी दयानंद गिरी यांच्या आश्रमात बराच वेळ घालवला. तेथील सुमारे १०० संतांसाठी दोघांनी भोजनाची व्यवस्था केली. सर्वांकडून आशिर्वादही घेतले. दोघांनी तिथे बसून ध्यानसाधनाही केली. 

Virat Anushka : विराट अनुष्काने लेक वामिकासोबत घेतला ट्रेकिंगचा आनंद, कोहली फॅमिलीच्या ऋषिकेश दौऱ्याचे Photos व्हायरल

यापूर्वीही विराट अनुष्काने लेकीसह वृंदावनाला भेट दिली होती. तिघांनीही वृंदावनात श्री परमानंदजींचे आशीर्वाद घेतले होते. वृंदावनहून परतल्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत अप्रतिम कामगिरी केली.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मापरिवारव्हायरल फोटोज्