Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली सहकुटुंब वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांना अनुष्का म्हणाली- "मनात अनेक प्रश्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:50 IST

मन प्रसन्न आहे? प्रेमानंद महाराजांच्या प्रश्नावर विराट म्हणाला...

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दोघंही अनेकदा उत्तराखंड येथील नीम करोली बाबा यांच्या आश्रमाला भेट देताना दिसतात. तसंच अनेकदा त्यांना भारतात असो किंवा लंडनमध्ये कीर्तन कार्यक्रमात दंग झालेलं आपण पाहिलं आहे. आता नुकतंच दोघंही वामिका आणि अकायला घेऊन वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. दोघांनी हात जोडून महाराजांना नमस्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला. याचा व्हिडिओ प्रेमानंद महाराजांच्याच सोशल मिडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.

वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांचं आश्रम आहे. लाखो भाविक त्यांना फॉलो करतात. विराट-अनुष्काही त्यांचं सत्संग ऐकतात. नुकतंच दोघांनी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं याचा व्हिडिओ महाराजांच्याच सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनुष्काने सांष्टांग दंडवत घालत नमस्कार केला. त्यांच्यासोबत वामिका आणि चिमुकला अकायही होते. मन प्रसन्न आहे? असं प्रेमानंद महाराजांनी त्यांना विचारलं. विराटने हसतच होकार दिला. नंतर अनुष्का म्हणाली, "गेल्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा मनात काही प्रश्न होते. मला वाटलं मी विचारेन पण त्याआधीच तिथे उपस्थित भाविक तसेच काहीसे प्रश्न विचारत होते. त्यामुळे आपोआप उत्तरं मिळत होती. मनातल्या मनात तुमच्याशी संवाद साधत होते. पुढच्या दिवशी मी कांतीक वार्तालाभ बघायचे आणि उत्तरं मिळायची. तुम्ही मला फक्त प्रेमभक्ती द्या."

यानंतर प्रेमानंद महाराज म्हणाले, "तुम्ही खूप बहादुर आहात. एकदा संसाराला लागलं की नंतर या भक्तीमार्गावर येणं खूप कठीण असतं. आम्हालाही वाटतं की तुमच्या भक्तीचा विशेष प्रभाव यांच्यावरही पडेल. देवावर विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि प्रेमाने राहा."

विराट-अनुष्का च्या या व्हिडिओवर क्रिकेटप्रेमींनी कमेंट्स केल्या आहेत. 'आता कोहलीचं कमबॅक होणार', 'अनेक शतकं झळकावणार कोहली' अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. तसंच विराटला धार्मिक मार्गावर आणण्यासाठी अनेकांनी अनुष्काचं कौतुकही केलं आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासोशल मीडियाअध्यात्मिक