Vipul Shah: प्रसिद्ध चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल शाह त्यांच्या बेधडक आणि प्रभावी कथांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नवीन चित्रपट 'The Kerala Story 2' मधून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर धक्कादायक आणि विचार करायला लावणारी कथा मांडली आहे. पहिल्या भागाच्या मोठ्या यशानंतर त्यांनी त्यांच्या सनशाईन बॅनरखाली या सिक्वेलची निर्मिती केली असून, ही कथा अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई होत आहे.चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना विपुल अमृतलाल शाह म्हणाले ,“सिक्वल हा केवळ एक ट्रेंड नसून तो सिनेमा आणि प्रेक्षकांमधील नातं अधिक मजबूत करतो. ‘द केरळ स्टोरी 2’चं यश भावनिक असल्याचं त्यांनी सांगितलं, कारण ते प्रेक्षकांच्या विश्वासामुळे आणि चित्रपटाच्या ठोस संदेशामुळे शक्य झालं आहे.”
ते पुढे म्हणाले की, “२०२६च्या पहिल्या तिमाहीत सिक्वेल चित्रपटांचं वर्चस्व पाहायला मिळालं. 'बॉर्डर-२','द केरळ स्टोरी २', आणि 'धुरंधर-२' सारख्या चित्रपटांनी हे सिद्ध केलं आहे की, पहिल्या भागाला मिळालेलं प्रेक्षकांचं खरं प्रेम दुसऱ्या भागाला अधिक उंचीवर घेऊन जातं. या वर्षाची पहिली तिमाही ही खऱ्या कथा, भावना आणि विश्वासाच्या विजयाची ठरली आहे.”
‘द केरळ स्टोरी 2’च्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना विपुल अमृतलाल शाह म्हणाले, “माझ्यासाठी या चित्रपटाचं यश खूप भावनिक आहे. ही फक्त कमाई किंवा आकड्यांची गोष्ट नाही, तर प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्या कथेला दिलेल्या पाठिंब्याची आहे. हा प्रेम आणि विश्वास मनाला स्पर्श करून जातो. एक फिल्ममेकर म्हणून असे क्षण आपल्याला आठवण करून देतात की आपण या कथा का सांगतो.”
देशभराला हादरवून सोडणाऱ्या 'The Kerala Story' च्या प्रभावानंतर या सिक्वेलने कथेला आणखी व्यापक स्तरावर नेलं आहे. शांतता आणि सत्य नाकारण्याच्या मानसिकतेपलीकडे जाऊन ही कथा अधिक ठळकपणे मांडली आहे.कामाख्या नारायण सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मित केला असून आशिन शहा हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.'सन शाईन पिक्चर्स'बॅनरखाली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही रिलीज करण्यात आला आहे.
Web Summary : Vipul Shah expresses gratitude for the success of 'The Kerala Story 2,' directed by Kamakhya Narayan Singh. He highlights the emotional connection with the audience and the film's powerful message, acknowledging the trend of successful sequels in 2026.
Web Summary : विपुल शाह ने 'द केरल स्टोरी 2' की सफलता पर आभार व्यक्त किया, जिसका निर्देशन कामाख्या नारायण सिंह ने किया है। उन्होंने दर्शकों के साथ भावनात्मक जुड़ाव और फिल्म के शक्तिशाली संदेश पर प्रकाश डाला, 2026 में सफल सीक्वल के चलन को स्वीकार किया।