Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रांत मेस्सीचा बहुचर्चित 'द साबरमती रिपोर्ट' आता OTT प्लॅटफॉर्मवर होतोय रिलीज; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:53 IST

'द साबरमती रिपोर्ट' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा या वर्षातील बहुचर्चित सिनेमा. 'द साबरमती रिपोर्ट' हा सिनेमा त्याच्या वेगळ्या विषयामुळे चर्चेत राहिला. या सिनेमाचं राजकीय स्तरावर चांगलं कौतुकही झालं. विक्रांत मेस्सी, रिद्धी डोग्रा, राशी खन्ना या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. 'द साबरमती रिपोर्ट' ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 'द साबरमती रिपोर्ट' आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.

'द साबरमती रिपोर्ट' आता ओटीटीवर होणार रिलीज

सिनेमागृहांमध्ये रिलीज झाल्यावर 'द साबरमती रिपोर्ट' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. पुढील ३०-४० दिवसांमध्ये  'द साबरमती रिपोर्ट' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केली होती. लवकरच zee 5 वर हा सिनेमा रिलीज होणार आहे. अजूनतरी 'द साबरमती रिपोर्ट'च्या ओटीटी रिलीजची अधिकृत रिलीज डेट समोर आली नाहीये. तरीही ज्यांना थिएटरमध्ये हा सिनेमा पाहता आला नाही त्यांना लवकरच ओटीटीवर या सिनेमाचा आनंद घेता येईल.

 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाविषयी

'द साबरमती रिपोर्ट' सिनेमात  विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये स्थानिक पत्रकाराच्या भूमिकेत आहे. २००२ साली झालेल्या गोध्रा ट्रेन अग्रीकांड प्रकरणानंतरच्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे. एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्मस अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूड