Join us

दीपिकाच्या नायकाने गुपचूप केला साखरपुडा, महिन्याभरानंतर मीडियात आली बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:10 IST

या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

ठळक मुद्देविक्रांत मेस्सीने गेल्या महिन्यात त्याची प्रेयसी शीतल ठाकूरसोबत गुपचूप साखरपुडा केला.

विक्रांत मेस्सीने दिल धडकने दो, हाफ गर्लफ्रेंड, लिपस्टिक अंडर माय बुरखा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो आता लवकरच दीपिका पादुकोणसोबत छपाक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विक्रांतने गुपचूप साखरपुडा केला असून ही बातमी महिन्याभरानंतर त्याच्या चाहत्यांना कळली आहे. विक्रांतनेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे.

विक्रांतने गेल्या महिन्यात त्याची प्रेयसी शीतल ठाकूरसोबत गुपचूप साखरपुडा केला. त्याने या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा याविषयी मी सगळ्या गोष्टी नक्कीच सांगेन. आम्ही साखरपुडा अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत केला. केवळ आमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियातील मंडळी उपस्थित होते. 

लग्नाबाबत त्याला विचारले असता त्याने सांगितले की, मी लग्न कधी करणार याविषयी योग्य वेळ येईन तेव्हा नक्कीच सांगेन... 

विक्रांतप्रमाणे शीतलदेखील एक अभिनेत्री आहे. तिने अल्ट बालाजीच्या ब्रोकन बट ब्युटीफूलच्या पहिल्या सिझनमध्ये विक्रांतसोबतच काम केले होते. दुसऱ्या सिझनमध्ये देखील ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

विक्रांतच्या छपाक या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोण