Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड संन्यास घेण्याच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आला विक्रांत मेस्सी! काय म्हणाला बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 09:42 IST

12th fail अभिनेता विक्रांत मेस्सीने बॉलिवूडमधून संन्यास घेण्याची घोषणा केल्यावर पहिल्यांदाच तो मीडियासमोर आला

अभिनेता विक्रांत मेस्सीने काल बॉलिवूडमधून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली. विक्रांतने अचानक हा निर्णय घेतल्याने सर्वांच्या भुवया उंंचावल्या. २०२५ ला आगामी सिनेमे रिलीज करुन विक्रांत ३७ व्या वर्षी बॉलिवूडमधून संन्यास घेणार आहे. दरम्यान काल विक्रांतच्या 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पंतप्रधान मोदींसाठी  आयोजित करण्यात आलं होतं. हे स्क्रीनिंग झाल्यावर मीडियाने विक्रांतला रिटायरमेंटबद्दल विचारताच तो काय म्हणाला बघा.

रिटायरमेंटबद्दल विचारताच विक्रांतने काय केलं?

संसद भवनात बालयोगी सभागृहात विक्रांतच्या 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पंतप्रधान मोदींसाठी आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी विक्रांतने मीडियाशी संवाद साधला की, "वैयक्तिकरित्या सांगायचं तर आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्यासोबत द साबरमती रिपोर्ट पाहण्याची संधी मिळाली हा माझ्या करिअरसाठी हाय पॉईंट आहे." असं म्हणताच मीडियाने विक्रांतला रिटायरमेंटबद्दल विचारले. त्यावेळी विक्रांतने या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करुन तो निघून गेला. त्याने त्याची सहअभिनेत्री राशी खन्नाला पुढे केलं.

विक्रांतने केली निवृत्तीची घोषणा

काल सोशल मीडियावर पहाटे पोस्ट टाकून विक्रांतने बॉलिवूडमधूून संन्यास घेण्याची घोषणा केली. विक्रांत म्हणाला की, "गेले काही वर्ष माझ्यासाठी फार वेगळी आणि विलक्षण आहेत. ज्यांनी मला कायम सपोर्ट केला त्या सर्वांचे मी आभार मानतो. परंतु मी आयुष्यात जसं पुढे जातोय तसं मला कळालं की एक पती, बाप, मुलगा आणि अभिनेता म्हणून आत्मपरिक्षण करायची गरज आहे. त्यामुळे पुन्हा घरी परतायची वेळ झाली आहे. २०२५ मध्ये आपण शेवटचे एकदा भेटू. जोवर योग्य वेळ येत नाही. माझे २ सिनेमे आणि असंख्य आठवणी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार. कायम मी तुमचा ऋणी असेन." विक्रांतने अचानक ही घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला.

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूड