नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी 'रामायण' हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाचा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या भव्य प्रकल्पाच्या स्टारकास्टबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अनेक कलाकारांच्या नावांच्या अफवा सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती या चित्रपटात बिभीषणाची भूमिका साकारणार आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र ही चर्चा केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अभिनेता विजय सेतुपतीने स्वतः या वृत्ताचे खंडन केले आहे. तो म्हणाला, "मी या प्रोजेक्टचा भाग नाही. या अफवा कुठून पसरल्या माहीत नाही," असे स्पष्ट करत त्याने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याआधी बिभीषणाच्या भूमिकेसाठी जयदीप अहलावतला ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याच्या आणि यशच्या तारखा जुळत नसल्याने जयदीपच्या हातून सिनेमा निसटला. आता विजय सेतुपतिही सिनेमाचा भाग नाही, मग बिभीषणाच्या भूमिकेत कोण दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार असून, सई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. तर 'केजीएफ' स्टार यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचे समजते. इतर कलाकारांमध्ये सनी देओल (हनुमान), रवी दुबे (लक्ष्मण), लारा दत्ता (कैकेयी), अरुण गोविल (दशरथ) आणि रकुल प्रीत सिंग (शूर्पणखा) यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून या नावांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.
नमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल ४००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. भव्य सेट आणि तगड्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर करणाऱ्या ट्रेलर आणि स्टारकास्टच्या माहितीची.
Web Summary : Vijay Sethupathi refuted rumors of playing Vibhishana in Nitesh Tiwari's 'Ramayana.' He clarified he's not involved, dismissing widespread speculation. The film stars Ranbir Kapoor and Yash.
Web Summary : विजय सेतुपति ने नितेश तिवारी की 'रामायण' में विभीषण की भूमिका निभाने की अफवाहों का खंडन किया। उन्होंने स्पष्ट किया कि वह शामिल नहीं हैं, और व्यापक अटकलों को खारिज कर दिया। फिल्म में रणबीर कपूर और यश हैं।