Join us

"मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय.."; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला?

By देवेंद्र जाधव | Updated: April 28, 2025 12:16 IST

छावा पाहून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. या अभिनेत्याने अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून चीड व्यक्त केलीय. याशिवाय औरंगजेबाला मुस्कटात मारण्याची इच्छा व्यक्त केलीय (chhaava, akshaya khanna)

'छावा' सिनेमाची (chhava movie) चांगलीच चर्चा झाली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींहून अधिक कमाई केली. 'छावा' सिनेमातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. विकी कौशलने (vicky kaushal) सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना (rashmika mandanna) दिसली.

या सिनेमात क्रूर, मग्रूर, निर्दयी अशा औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना (akshaye khanna) झळकला. अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत जो अभिनय केला, त्याचं चांगलंच कौतुक झालं. अशातच 'छावा' पाहून एका प्रसिद्ध अभिनेत्याने "औरंगजेबाच्या मुस्कटात द्यावीशी वाटतेय", असं वक्तव्य केलंय.

मला औरंगजेबाच्या मुस्कटात द्यावीशी वाटतेय

अभिनेता विजय देवराकोंडाने 'छावा' पाहून मोठं वक्तव्य केलंय. विजय नुकताच 'रेट्रो' सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी तो म्हणाला की, "छावामध्ये अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून मला खूप राग आला. मी औरंगजेबाला भेटून, त्याला दोन-तीन थोबाडीत कशा मारता येतील, याच्या संधी शोधेल. सध्या माझ्या डोक्यात हेच विचार आहेत. याशिवाय इंग्रजांना भेटून त्यांनाही कानाखाली मारण्याची माझी इच्छा आहे. अशा अनेक लोकांना भेटून त्यांना मारायची माझी इच्छा आहे."

अशाप्रकारे विजयने त्याचा राग व्यक्त केलाय. याच इव्हेंटमध्ये विजयला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल, हे विचारलं असता तो म्हणाला की, "मला जर भूतकाळात जाण्याची संधी मिळालीच तर मी श्रीदेवी, राम्या कृष्णन आणि विजयाशांती यांना भेटून त्यांच्यासोबत काम करायला आवडेल." याशिवाय दिया, सिमरन, सोनाली बेंद्रे किंवा ज्योतिका या अभिनेत्रींसोबतही विजयला काम करण्याची इच्छा आहे, असं वक्तव्य त्याने केलं.

 

 

टॅग्स :विजय देवरकोंडाअक्षय खन्ना'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदाना