Join us

जगातील टॉपच्या मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवालचे नाव सामिल, देशभरातून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 20:14 IST

आता सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवलदेखील गणला जाणार आहे. खुद्द विद्युतनेच याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे.

बॉलिवूडमध्ये एक्शन हिरोपैकी एक विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वतः स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. विद्युतच्या जवळपास सर्वच सिनेमात बाकी काही असो वा नसो पण धमाकेदार अ‍ॅक्शन असतातच. तो नेहमीच त्याच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्स फॅन्सना नेहमीच आश्चर्यचकित करत असतो.आजपर्यंत त्याच्या सिनेमात चित्रित झालेले सगळेच स्टंट विद्युत जामवलने स्वतःच केले आहेत. त्यामुळेच आज विद्युत जामवाल हा फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव बनला आहे.अ‍ॅक्शन सिनेमांमधील पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेला विद्युत जामवाल त्याच्या स्टंटमुळेच पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात. त्याचे स्टंटचे व्हिडीओंना भरभरुन पसंती देतात. विद्युत जामवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवलदेखील गणला जाणार आहे.  खुद्द विद्युतनेच याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. एक फोटो शेअर करत त्याने लिहीले आहे की, जेव्हा तुम्ही गुगलवर माझे नाव सर्च कराल, तेव्हा माझ्या नावाच्या बाजुला सर्वात्तम मार्शल आर्टिस्ट असे लिहीलेले दिसेल. विद्युतच्या कामगिरीमुळेच आज  सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट विद्युतची पोस्ट वाचताच चाहत्यांनी देखील विद्युतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विद्युतचे नाव आता जगातले प्रख्यात जॅकी चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन,स्टीवन सीगल,डोनी येन यांसारख्या दिग्गजांबरोबर घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्युत जामवाल हा एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याचे नाव या जग प्रख्यात पर्सनालिटीजच्या यादीत गणले जात आहे. देशभरातून विद्युतवर कौतुकाव वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्युत जामवाल त्याच्या कारकिर्दीने अशीच गगनभरारी घ्यावी अशाच कमेंट्स चाहते करत आहेत. 

टॅग्स :विद्युत जामवालजॅकी चॅन