Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पिंक’चा तामिळ रिमेक बनणार; विद्या बालन झळकणार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 12:58 IST

दोन वर्षांपूर्वी अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शिक ‘पिंक’ हा सोशल ड्रामा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी स्टारर या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. बॉक्सआॅफिसवरही चित्रपट हिट झाला. चित्रपटाचे हे यश पाहून आता साऊथमध्येही या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी अनिरूद्ध राय चौधरी दिग्दर्शिक ‘पिंक’ हा सोशल ड्रामा प्रचंड गाजला. अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि किर्ती कुल्हारी स्टारर या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. बॉक्सआॅफिसवरही चित्रपट हिट झाला. चित्रपटाचे हे यश पाहून आता साऊथमध्येही या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.होय, तामिळ फिल्ममेकर एच. विनोद आणि निर्माते बोनी कपूर यांनी ‘पिंक’च्या तामिळ रिमेकवर काम सुरु केले आहे. या रिमेकची स्टारकास्टही चर्चेत आहे. होय, तामिळ सुपरस्टार अजित या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे तर तापसी पन्नूची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्या झोळीत पडली आहे.

अलीकडे बोनी कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला. विद्या या रिमेकमध्ये असले, असे त्यांनी सांगितले. तामिळ प्रेक्षक डोळ्यांपुढे ठेवून ‘पिंक’च्या तामिळ रिमेकच्या कथेत थोडाफार बदल केला जाणार आहे. विद्याची भूमिका मात्र आहे तशीच असेल.

याचवर्षी जुलैमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे तर एप्रिल २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. लवकरच विद्या ‘एनटीआर’ यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे. एन.टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये एन.टी.आर. यांची पत्नी बसवाताराकम यांची भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. एनटीआर यांचा मुलगा नंदमुरी बालाकृष्णन चित्रपटात आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. रवि किशन रामाराव यांच्या जवळच्या मित्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. तसेच नंदमुरी बालाकृष्णन, विद्या बालन,रवी किशन यांच्यासोबत बाहुबली फेम राणा दुग्गाबत्तीदेखील या बायोपिकमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अलीकडे विद्या ‘तुम्हारी सुलू’ या बॉलिवूडपटात दिसली होती.

टॅग्स :विद्या बालनबोनी कपूर