Join us

"तुझं करिअर संपून जाईल...", The Dirty Picture मधील बोल्ड भूमिकेमुळे विद्या बालनला मिळालेला सल्ला, १२ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:52 IST

अभिनेत्री विद्या बालनची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिनेत्री विद्या बालनची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात हा सगळा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कहानी,पा, शकुंतला देवी अशा अनेक सिनेमांत विद्याने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. विद्याच्या ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमाने तर धूम केली. या सिनेमात विद्याने कधी नव्हे इतकी बोल्ड भूमिका साकारली होती. विद्याने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला आहे. मात्र, तिचा इतपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.  

गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विद्या बालन म्हणाली की, जेव्हा तिला 'द डर्टी पिक्चर'मध्ये सिल्क स्मिताच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली तेव्हा तिचा खरोखर विश्वासच बसत नव्हता. अभिनेत्री म्हणते, 'मिलन लुथरिया पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मला वाटलं, 'तुम्ही चुकीच्या दारात तर आला नाही ना?' कारण मला कोणीतरी खरोखरच ही भूमिका ऑफर करेल यावर विश्वास बसत नव्हता.

विद्या बालनने पुढे खुलासा केला की, जेव्हा तिने सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी होकार दिला तेव्हा लोकांनी तिला सावध केले होते. चित्रपटात ही भूमिका केल्याने तिचं करिअर उद्ध्वस्त होईल, असे लोकांचे म्हणणे होते. अभिनेत्री म्हणाली- 'तिथे काही लोक होते ज्यांनी मला विचारले, 'तुला खात्री आहे का? यामुळे तुमचे करिअर बर्बाद होईल. 

‘डर्टी पिक्चर’ या सिनेमात विद्या बालनने सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारली होती. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. यात विद्यासोबत इमरान हाश्मी आणि नसीरूद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :विद्या बालन