Join us

Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 01:37 IST

राज कपूर विशेष योगदान पुरस्काराच्या निमित्ताने काजोलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती मराठीत बोलत होती, त्यावेळी तिला हिंदीत प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर काय घडलं, ती काय म्हणाली...?

Kajol Latest News: अभिनेत्री काजोलचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी आलेल्या काजोलने माध्यमांशी संवाद साधला आणि गौरवाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी तिला जेव्हा हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर ती भडकली अन् म्हणाली, "अब मैं हिंदी में बोलो??? जिसको समझना है, वो समझ लेंगे." नक्की काय घडलं?

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

माध्यमांशी बोलताना काजोल म्हणाली, "हा पुरस्कार मला या (वाढदिवसाच्या दिवशी) दिवशी भेटतोय. माझ्यासाठी हा मोठा दिवस आहे. तिलाही हा पुरस्कार भेटला होता. त्यामुळे ही माझ्यासाठी खूप गोष्ट आहे." 

हिंदीत बोल म्हटल्यानंतर काजोल म्हणाली...

असं बोलल्यानंतर काजोलला एका प्रतिनिधी हिंदीत बोला असं म्हटला आणि प्रश्न विचारला.  त्यावर काजोलचा पारा चढला. त्यावर तिने हिंदीतूनच त्याला उत्तर दिले. "आता मी हिंदीतून बोलू? ज्यांना समजून घ्यायचं असेल, ते समजून घेतील (अब मैं हिंदी में बोलो??? जिसको समझना है, वो समझ लेंगे)", असे उत्तर ती म्हणाली. 

काजोल संतापली... बघा काय घडलं?

मराठी सिनेमात भूमिका करण्याबद्दल काजोलला यावेळी प्रश्न विचारण्यात आला. ती म्हणाली, "नक्कीच मी काम करेन. त्याबद्दल शंका नाही. मला तशी पटकथा मिळाली तर मी करेन." त्यानंतर हसत म्हणाली हिंदीत सांगायचं तर "जरूर करूंगी." 

"मी जास्त चित्रपट बघतच नाही. मी टीव्ही जास्त बघत नाही. तर हा प्रश्न जो आहे, तो माझ्यासाठी थोडा विचित्र आहे", असेही काजोल यावेळी म्हणाली. 

टॅग्स :काजोलसेलिब्रिटीबॉलिवूड