Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत Deepika-Ranveerला मिळाले हे खास गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 19:49 IST

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने खूप डान्स केला. कपिल आणि गिन्नी चतरथला दीपवीरच्या जोडीने काय गिफ्ट दिले ते माहिती नाही मात्र कपिलने त्यांना स्पेशल गिफ्ट दिले.

ठळक मुद्देकपिल आणि गिन्नीच्या रिसेप्शनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेकपिल शर्माने गत 24 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिले

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या रिसेप्शन पार्टीत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने खूप डान्स केला. कपिल आणि गिन्नी चतरथला दीपवीरच्या जोडीने काय गिफ्ट दिले ते माहिती नाही मात्र कपिलने त्यांना स्पेशल गिफ्ट दिले. सोशल मीडियावर कपिल आणि गिन्नीच्या रिसेप्शनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दीपिका-रणवीर केप कापताना दिसतायेत. कपिल रणवीरला केप कापायला सांगतोय. 

त्यानंतर दीपिका,रणवीर, कपिल,गिन्नी आणि कपिलची आई यांनी मिळून हा केप कापला.  कपिलचे दीपिकावर क्रश असल्याचे त्याने अनेकदा त्याच्या शोमध्ये सांगितले होते. ऐवढेच नाही तर तो दीपिकाला प्रेमाने 'दीपू' अशी हाक मारायचा.

 

कपिल शर्माने गत 24 डिसेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिले. ज्या रिसेप्शन पार्टीत टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. कपिल शर्मा लवकरच टीव्हीवर कमबॅक करतोय. पहिल्या एपिसोडचा प्रोमोही रिलीज झाला आहे. ‘द कपिल शर्मा शो सिझन 2’ च्या पहिल्या भागात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हजेरी लावणार आहे. त्याचसोबत त्याचे भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि वडील सलीम खानही या कार्यक्रमात दिसणार आहेत. याशिवाय या भागात प्रेक्षकांना रणवीर सिंग आणि सारा अली खान यांना देखील पाहायला मिळणार आहेत.

टॅग्स :कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथदीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग