Join us

Video : अशास्थितीत शाहरूख नाही तर सलमान खानला प्लेनबाहेर फेकणार आमिर खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 13:38 IST

‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हजेरी लावली.

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा चॅट शो कायम चर्चेत असतो. या चॅट शोमधील करणचे काहीसे चित्रविचित्र प्रश्न आणि सेलिब्रिटींची त्यावरची उत्तरे हे सगळे मजेशीर असते. सध्या करणच्या या शोचे सहावे सीझन सुरू आहे. या शोमध्ये अलीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने हजेरी लावली. हा एपिसोड लवकरचं प्रसारित होणार आहे. तूर्तास याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. करणच्या अनेक प्रश्नांना आमिरने इंटरेस्टिंग उत्तरे दिलीत.

एका व्हिडिओत मलायका अरोरा आमिर खानला प्रश्न विचारताना दिसतेय. प्लेनमध्ये एकच सीट आहे आणि सलमान व शाहरुख या दोघांपैकी तुला कुण्या एकाला बाहेर फेकायचे आहे तर तू कुणाला बाहेर फेकशील? असे मलायकाने त्याला विचारले. यावर आमिरने कुणाचे नाव घ्यावे? तर सलमान खानचे. होय, मी सलमानला बाहेर फेकेल, असे आमिर म्हणाले. का? असे विचारल्यावर, ‘क्यों की भाई कभी नहीं डूबेगा’, असे मजेशीर उत्तर आमिर दिले.आमिर खान यापूर्वीही करणच्या ‘कॉफी विद करण’मध्ये दिसला आहे. यापूर्वी तो फातिमा सना शेख आणि सानिया मल्होत्रा या दोघींसोबत आला होता. त्याहीआधी तो पत्नी किरण रावसोबत दिसला होता. आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ हा चित्रपट  येत्या ८ नोव्हेंबरला रिलीज होतोय. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :आमिर खानसलमान खानशाहरुख खानकरण जोहर