बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदानाची (Rashmika Mandanna) मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' (Chhaava) या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक दिवस उलटले आहेत, तरीही 'छावा' पाहण्यासाठी आजही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होताना दिसतेय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा' (Chhaava) चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आज ३९ वा दिवस आहे. 'छावा'नं सहाव्या आठवड्याच्या शेवटीही वर्चस्व कायम ठेवलं. आयपीएलचा कोणताही परिणाम चित्रपटावर झाला नाही. 'सिकंदर' पुढील रविवारी ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होत असला तरीही 'छावा'चा प्रभाव अजूनही कायम आहे. 'छावा'नंआतापर्यंत ५८१ कोटी कमावले आहेत.
'छावा' हा चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी १३० कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे. या चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. 'पुष्पा २', 'अॅनिमल' आणि सलमान खानच्या आगामी चित्रपट 'सिकंदर'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी रश्मिका मंदान्ना देखील या चित्रपटात आहे. आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांच्याव्यतिरिक्त अक्षय खन्नानेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.