Join us

लोकमतच्या कार्यक्रमात विकी कौशलने नागपूरकरांशी मराठीत साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 20:18 IST

मनमर्जियां या चित्रपटाची संपूर्ण टीम लोकमतच्या इव्हेंट मध्ये आली असून नागपूरकरांनी एकच गर्दी केली आहे. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल यांना पाहण्यासाठी जणू नागपूरची तरुणाई एकत्र आली आहे.

मनमर्जियां या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल नागपूरमध्ये दाखल झाले असून लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असलेल्या सूत्रसंचालकाने आप में से कितने लोगो ने प्यार किया है... आपको दिखाते है क्या है प्यार म्हणत सगळयांना मनमर्जियां चित्रपटाचा ट्रेलर दाखवला. उपस्थितांनी हा ट्रेलर पाहिल्यानंतर टाळ्यांचा गडगडाट केला. याच दरम्यान विकीने ऑडियन्स मधूनच ग्रँड एन्ट्री घेतली. आणि शानदार नृत्य सादर केले. विकीने नृत्य झाल्यावर नागपूरकरांशी सवांद साधला. विशेष म्हणजे, नागपूर कसं  काय, बरं आहे का म्हणत त्याने मराठीत सुरुवात केली. त्यानंतर तो म्हणाला, अशी गर्दी मी कधीच पहिली नाही... हे स्टेडीयम भरेल का याची मला काळजी होती पण आता पाय ठेवायला देखील जागा नाही आहे. मी खुश आहे, आय लव्ह यु नागपूर. 

मनमर्जियां या चित्रपटाची संपूर्ण टीम लोकमतच्या इव्हेंट मध्ये आली असून नागपूरकरांनी एकच गर्दी केली आहे. अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल यांना पाहण्यासाठी जणू नागपूरची तरुणाई एकत्र आली आहे. खचाखच भरलेल्या मनकापूर इनडोअर स्टेडियम मधील गर्दीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे.  

टॅग्स :विकी कौशलअभिषेक बच्चनतापसी पन्नू