Join us

Video: अमेरिकेत गरजली 'छावा'ची डरकाळी, अंगावर शहारा आणणारा डान्स एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:54 IST

फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे.

Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा 'छावा' (Chhaava) हा ऐतिहासिक चित्रपट 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला.  प्रदर्शित होताच 'छावा सिनेमाने महाराष्ट्रात सर्वांनाच वेड लावलं आहे. फक्त महाराष्ट्रात नाहीतर संपुर्ण देश आणि विदेशातही सर्वत्र 'छावा'ची तुफान चर्चा आहे. सिनेमातील तगड्या कलाकारांची फौज आणि संगीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलं आहे. सिनेमातील "आया रे तुफान" हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवरजवळ तरुणांनी "आया रे तुफान" गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. लॉरेन गॉटलीब आणि रोहित गिजारे यांच्या टीमनं डान्स करत छत्रपती शंभू राजेंना मानवंदना दिली आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीला १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा डान्सचा व्हिडीओ अभिनेता विकी कौशल, ए. आर. रहमान आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनीदेखील त्याच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केलाय.

'छावा' सिनेमाची संगीत दिग्दर्शक म्हणून ए .आर . रेहमान यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 'आया रे तुफान' हे नवीन गाणं त्यांच्या व मराठमोळी गायिका वैशाली सामंतच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'बिग बजेट' सिनेमानं आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आत्तापर्यंत 'छावा' ने देशात बॉक्स ऑफिसवर तब्बल १४०.५० कोटी कमावले आहेत. तर जगभरात एकूण १६४.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. 'छावा' ने चारच दिवसांत सिनेमाचं बजेट वसूल केलं आहे.

टॅग्स :विकी कौशलअमेरिकारश्मिका मंदाना