Join us

विकी कौशलच्या या फोटोवर दोन तासात आले 7 लाखापेक्षा जास्त लाईक्स, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:10 IST

उरी सिनेमाच्या यशानंतर विकी कौशलच्या करिअरचा ग्राफ एका उंचीवर गेला आहे. विक्की सध्या आगामी सिनेमा सरदार उधम सिंगमध्ये व्यस्त आहे.

उरी सिनेमाच्या यशानंतर विकी कौशलच्या करिअरचा ग्राफ एका उंचीवर गेला आहे. विक्की सध्या आगामी सिनेमा  सरदार उधम सिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी विकी अमृतसरला रवाना झाला आहे. अमृतसरला गेल्यावर विकीने शूटिंग सुरु होण्याच्या आधी सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. पुढचे काही दिवस विकी 'सरदार उधम सिंग'च्या शूटिंगसाठी अमृतसरमध्येच असणार आहे. विक्कीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विकीच्या या फोटो त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

'सरदार उधम सिंग'च्या भूमिकेसाठी विकी बरीच मेहनत घेतोय आहे.  3 महिन्यात विकीने 13 किलो वजन कमी केले आहे. शूजीत सरकार दिग्दर्शित सरदार उधम सिंगमध्ये विकी खूपच भूमिका साकारताना दिसणार आहे.

'सरदार उधम सिंग' हा सिनेमा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला 'सरदार उधम सिंग' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

उधम सिंग 2 ऑक्टोबर 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली.      

टॅग्स :विकी कौशल