Join us

Sara Ali Khan : अभिनेत्रीचा कारनामा! सारा अली खानने एयरपोर्टवर चोरली उशी; अभिनेत्याने केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 16:31 IST

Sara Ali Khan And Vicky Kaushal : विकी कौशलने सारा अली खानचे एक गुपित उघड केले आहे. ज्यामध्ये सारा अली खानने उशी चोरल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री सारा अली खान आणि विकी कौशल त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार देशभरातील विविध शहरांना भेटी देत ​​आहेत. यासोबतच ते एकमेकांची वेगवेगळी गुपितेही उघडत आहेत. आता अलीकडेच विकी कौशलनेसारा अली खानचे एक गुपित उघड केले आहे. ज्यामध्ये सारा अली खानने उशी चोरल्याचं समोर आलं आहे.

जरा हटके जरा बचकेच्या यशस्वी सक्सेस मीटदरम्यान, विकी आणि साराला विचारण्यात आले की त्यांनी कधी हॉटेलच्या खोल्यांमधून सामान घेतलं आहे का?. यानंतर विकीने लगेचच साराकडे पाहिलं आणि साराने सांगितलं की तिला अतिरिक्त सामानाची माहिती मिळाली जेव्हा तिची आई अमृता सिंगला सांगितलं की तिच्या बॅगचं वजन 10 किलो जास्त आहे. सारा म्हणाली, 'आम्ही महिनाभर सहलीला जात होतो. त्यासाठी मी शाम्पू, कंडिशनर, लोशन आणि टूथपेस्ट गोळा केलं होतं. 

विक्की कौशलने सांगितले की, साराला अजूनही हॉटेलमधून वस्तू गोळा करण्याची आवड आहे. विकी साराचा मजेदार किस्सा सांगतो आणि म्हणतो, 'विमानतळावरून उशी कोण घेतं? सारा तिथे 10 मिनिटे झोपली आणि तिला उशी आवडली. त्यानंतर सारा त्या उशीसोबत 3 राज्यात फिरली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सारा अली खानने स्वत: कबूल केले होते की ती खूप कंजूस आहे. एका अवॉर्ड शोसाठी अबू धाबीला पोहोचलेल्या सारा अली खानने ब्रूट इंडियाशी केलेल्या संभाषणात कबूल केलं की रोमिंग फीसाठी 400 रुपये खर्च करण्याऐवजी तिने तिच्या आसपासच्या लोकांकडे हॉटस्पॉट मागितला होता. याशिवाय देखील सारा कंजूस असल्याचे अनेक किस्से आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :सारा अली खानविकी कौशलबॉलिवूडविमानतळ