Join us

विकी कौशल चक्क म्हणतोय, नो कंडोम प्लीज... हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:11 IST

विकी कौशल एका वेगळ्याच कारणामुळे नुकताच चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देविकीला कंडोमवर आधारित एका चित्रपटाबाबत विचारण्यात आले होते. पण या चित्रपटाच्या विषयामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे.

विकी कौशल आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असून त्याला नुकतीच एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण एका विशिष्ट कारणावरून त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याची चर्चा रंगली आहे. 

विकीला कंडोमवर आधारित एका चित्रपटाबाबत विचारण्यात आले होते. पण या चित्रपटाच्या विषयामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. त्याने आता नाही... नंतर बघुया असे उत्तर दिले असल्याचे म्हटले जात आहे.

उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

रमण राघव, मनमर्जिया, संजू, राझी आणि उरीः द सर्जिकल स्ट्राईक या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :विकी कौशल