Join us

छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसला विकी कौशल, 'छावा'च्या सेटवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 09:41 IST

'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचे फोटो व्हायरल, संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभतोय 'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचे फोटो व्हायरल, संभाजी महाराजांच्या भूमिकेत वेधून घेतोय लक्ष

अभिनेता विकी कौशल सध्या चांगलाच चर्चेत आहे. विकी कौशलने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं. विकी सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे आगामी 'छावा' सिनेमाच्या शूटींगमध्ये तो व्यस्त आहे. 'छावा' सिनेमात विकी संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. विकीच्या या सिनेमाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. अशातच 'छावा' सिनेमातील विकीचा संभाजी महाराजांचा लूक समोर आलाय.

विकी कौशलचा 'छावा' सिनेमातील लूक व्हायरल झालाय. या फोटोत तुम्हाला बघायला मिळेल की.. गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर शिवगंध, केस बांधलेले अशा खास अवतारात विकीचा लूक समोर आलाय. विकी संभाजी महाराजांच्या भूमिकेत चांगलाच शोभतोय. त्याची पिळदार शरीरयष्टी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आणखी प्रभावी वाटत आहे. विकीच्या 'छावा' सिनेमाला लोकांचं प्रेम मिळणार यात शंका नाही. 

'छावा' सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. लक्ष्मण यांचं दिग्दर्शन असलेला 'मिमी' सिनेमा चांगलाच गाजला. आता लक्ष्मण पहिल्यांदाच 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून ऐतिहासीक कलाकृती भेटीला आणणार आहेत. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय मराठमोळा संतोष जुवेकर सुद्धा खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

 

टॅग्स :विकी कौशलसंभाजी राजे छत्रपतीरश्मिका मंदानासंतोष जुवेकर