Join us

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी व कतरिनाच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स, हे नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:24 IST

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Viral Memes: सोशल मीडियावर विकी व कॅटच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल.

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विकी कौशलकतरिना कैफच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. विकी व कॅट दोघंही काहीही बोलायला तयार नाहीत. पण लग्नाच्या बातम्यांचा जणू पूर आला आहे. अगदी विकी व कॅट लग्न करणार त्या राजस्थानच्या राजवाड्याचं भाडं काय, इथपासून या लग्नात कोण कोण येणार अशा सगळ्या चर्चा आहेत. या लग्नातील सुरक्षा बंदोबस्ताचीही चर्चा आहेच. अशात सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा होणार नाही तर नवल. सोशल मीडियावर विकी व कॅटच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल.

जयपूरमध्ये येत्या 9 डिसेंबरला विकी व कतरिना लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. या लग्नासाठी म्हणे पाहुण्यांसाठी कडक नियम बनवण्यात आले आहेत. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी हा आटापीटा सुरु असल्याचं कळतंय. यावरचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेव्हा बघा..

 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल