Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलनं केला पत्नी कतरिनाचा अपमान? नेटकरी भडकले, असं नेमकं काय म्हणाला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:47 IST

चाहत्यांनी विकीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, त्याने कतरिनाचा अपमान केल्याचं म्हटलंय

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे इंडस्ट्रीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. कतरिना-विकी यांच्यात खूप छान नाते आहे. दोघांनी २०२१ साली लग्नगाठ बांधली. राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य किल्ल्यात दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. लग्नाच्या ४ वर्षांनंतर ते आई-बाबा झाले. गेल्यावर्षी  ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. विकी हा कतरिनाचा कायम आदर करताना दिसून आला. तिच्याबद्दल बोलताना त्याच्या शब्दात कायम प्रेम झळकतं. हे पाहून त्याला चाहत्यांनी 'ग्रीन फ्लॅग' नाही तर 'ग्रीन फॉरेस्ट' असेही संबोधले. पण, आता विकीला त्यानं केलेला एक विनोद भारी पडला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी विकीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, त्याने कतरिनाचा अपमान केल्याचं म्हटलंय.

दैनिक जागरणनुसार, मंगळवारी एका लग्नसमारंभातील विकीचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तो स्टेजवर उभा राहून नवऱ्याला मजेत विचारतो, "हाऊ इज द जोश?" त्यावर उपस्थित 'हाय, सर!" असे उत्तर देतात. यानंतर विकी हसत म्हणतो, "मी पाहिलंय की बॅचलर्सचा जोश नेहमी हाय असतो, पण आपण लग्न झालेल्या लोकांचा जोश वर्षागणिक कमी होत जातो".त्याच्या या वक्तव्यामुळे काही चाहत्यांना राग आला. नेटकऱ्यानी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की, अशा प्रकारचे विनोद सार्वजनिक ठिकाणी करणे योग्य नाही.

एका युजरने लिहिले, "२०२६ आलं तरी आपण अजूनही स्त्रियांच्या विरोधात असे जोक्स केला जात आहेत". तर दुसऱ्याने म्हटलं, "पुरुष जेव्हा सगळ्यांसमोर आपल्या लग्नाची खिल्ली उडवतात, तेव्हा ते अप्रत्यक्षपणे आपल्या पत्नीचा अपमान करत असतात".

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विकी कौशल लवकरच संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा एक भव्य ऐतिहासिक ड्रामा असून हा सिनेमा २०२६ नव्हे तर २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Vicky Kaushal's joke on Katrina sparks outrage: Did he insult her?

Web Summary : Vicky Kaushal's joke about married life has upset some fans who feel he disrespected Katrina Kaif. He said married men's enthusiasm diminishes yearly. He will be seen in 'Love & War' with Alia and Ranbir.
टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ