Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:01 IST

९ फेब्रुवारीपासून 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये सिनेमाची तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत.

सध्या जिकडेतिकडे फक्त एकाच बिग बजेट सिनेमाची चर्चा सुरू आहे तो म्हणजे 'छावा'. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यकथेवर आधारित असणारा हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. या सिनेमात विकी कौशलछत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'छावा' सिनेमाचा ट्रेलर आणि गाण्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

९ फेब्रुवारीपासून 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या ७२ तासांमध्ये सिनेमाची तब्बल ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. भारतभरातील अनेक थिएटर्स 'छावा'च्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाउसफुल्ल आहेत. त्यामुळे रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर  'छावा'चं राज्य असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून आत्तापर्यंत ७.३ कोटींची कमाई केली आहे. 'छावा' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी आणि रश्मिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना झळकणार आहे. याशिवाय आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेन्टी हे कलाकार सुद्धा ‘छावा’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ए आर रेहमान यांनी सांभाळली आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकार दखील झळकले आहेत. 

टॅग्स :विकी कौशलछत्रपती संभाजी महाराजरश्मिका मंदाना