Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधरचा खरा हिरो रणवीर नाही?', अभिनेत्री तनुजा यांनी Dhurandhar 2 विषयी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:43 IST

Dhurandhar 2:  धुरंधर २मध्ये रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही तर त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहता आली.

Dhurandhar 2: आदित्य धर यांचा 'धुरंधर २' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने सुरु केलेली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी अजूनही सुरुच आहे. प्रेक्षकांसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हा सिनेमा पाहिला आहे. यात काही लोकप्रिय कलाकारांनी तर धुरंधर २ चा रिव्ह्यू सुद्धा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी नुकताच हा सिनेमा पाहिला असून चित्रपटातील खरा हिरो कोण? हे त्यांनी सांगितलं आहे.

 धुरंधर २ मध्ये रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही तर त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहता आली. त्यामुळे अनेकांनी रणवीरला धुरंधरचा खरा हिरो म्हटलं आहे. मात्र, या सगळ्यामध्ये तनुजा यांनी मात्र, रणवीरऐवजी दिग्दर्शक आदित्य धर हाच खरा सिनेमाचा हिरो आहे, असं म्हटलं आहे.

अभिनेत्री आणि तनुजा यांची धाकटी लेक तनीषा मुखर्जी हिने तिच्या एक्स अकाऊंटवर तनुजा यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी धुरंधर २ चा रिव्ह्यू दिला आहे. 'धुरंधर २ कसा वाटला?'', असा प्रश्न तनीषाने तनुजा यांना विचारला. त्यावर, ''हा सिनेमा म्हणजे आऊटस्टॅंडिंग, अमेझिंग असा आहे'', असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या उत्तरावर तनीषाने त्यांना 'सिनेमाचा खरा हिरो कोण वाटतो, रणवीर सिंह की आदित्य धर?' असा दुसरा प्रश्नही विचारला. त्यावर, त्यांनी पटकन आदित्यचं नाव घेतलं. 

 ''११० टक्के सांगते सिनेमाचा खरा हिरो दिग्दर्शक आहे. तो उत्तम दिग्दर्शक आहे. सुंदररित्या त्याने हा सिनेमा हाताळला. हा सिनेमा मोठा असूनही त्याने छान सादर केला'', असं तनुजा म्हणाल्या. दरम्यान, रणवीरसह आदित्य धरचं सुद्धा सर्व स्तरांमधून कौतुक होतं आहे. बॉलिवूडसह साऊथच्या कलाकारांनीही 'धुरंधर २' वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tanuja: Director, not Ranveer, is the real hero of Dhurandhar 2.

Web Summary : Veteran actress Tanuja praises 'Dhurandhar 2', declaring director Aditya Dhar the true hero, surpassing Ranveer's acclaimed performance. She lauded Dhar's exceptional direction.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगसेलिब्रिटीसिनेमा