Join us

चक्क बहिणीनेच केला होता जितेंद्रवर बलात्काराचा आरोप; प्रकरण कोर्टात गेलं अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 14:49 IST

Jeetendra: बॉलिवूडचा जंपिंग जॅक जितेंद्र यांच्यावर बहिणीने केलेल्या आरोपानंतर अनेकांची त्यांच्याकडे पाहायची नजर बदलली होती.

आपल्या दमदार अभिनयामुळे आणि चार्मिंग लूकमुळे बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे जितेंद्र.  त्या काळात जितेंद्रची महिलांमध्ये तुफान क्रेझ होती. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी तरुणी प्रचंड धडपड करायच्या. विशेष म्हणजे पडद्यावर झळकणाऱ्या या अभिनेत्याचं पर्सनल लाइफही तितकीच चर्तेत राहिलं आहे. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यावर त्याच्या बहिणीनेच गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर हे प्रकरण पार कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.

बॉलिवूडचा जंपिंग जॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जितेंद्र यांच्यावर त्यांच्या मामे बहिणीने चक्क बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपानंतर साऱ्यांनाच धक्का बसला होता. इतकंच नाही तर अनेकांची जितेंद्रकडे पाहायची नजर बदलली होती. विशेष म्हणजे हे प्रकरण अगदी कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.

काय आहे जितेंद्रच्या बहिणीचा आरोप?

"जितेंद्रच्या मामेबहिणीने हिमाचल प्रदेशच्या डीजीपीकडे लेखी तक्रार केली होती. यात, मी १८ वर्षांची असताना जितेंद्र यांच्या कुटुंबियांना भेटले होते. त्यावेळी त्यांचं वय २८ वर्ष होतं. त्यानंतर १९७१ मध्ये जितेंद्र यांनी मला त्यांच्या सिनेमाच्या सेटवर बोलावलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि आणखी दोन जण होते. मात्र, दिल्ली ते सिमला या संपूर्ण प्रवासात माझ्याशी कोणीही काही बोललं नाही. त्यानंतर आम्ही सिमलाला पोहोचल्यानंतर जितेंद्र यांनी मला हॉटेलमध्ये आराम करायला सांगितलं आणि ते मित्रांसोबत फिरायला गेले. रात्री उशीरा ते हॉटेलवर पोहोचले. त्यावेळी मी माझ्या बेडवर पाठमोरी झोपले होते. याच वेळी ते माझ्या बेडवर आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी प्रचंड दारु प्यायली होती", असं त्यांच्या बहिणीने म्हटलं.

पुढे ती म्हणते, "त्यानंतर ते त्यांच्या जागी जाऊन झोपले. सकाळी त्यांनी ड्रायव्हरकडून माझ्यासाठी कपडे मागवले आणि सकाळी मला दिल्लीला परत पाठवलं", असं तिने तक्रारीमध्ये म्हटलं होतं.

जितेंद्र यांनी कोर्टात मांडली बाजू

जितेंद्र यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू कोर्टात मांडली. तसंच 'हे प्रकरण बनावट, निराधार आणि हास्यास्पद आहे. केवळ जितेंद्र यांना नाहक त्रास देण्यासाठी हा कट रचला आहे,' असं जितेंद्र यांच्या वकिलांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :जितेंद्रबॉलिवूडसेलिब्रिटी