Join us

केदारनाथ फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, '3 इडियट'मध्येही होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 08:29 IST

एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे ४.३० वाजता मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ७९ वर्षांचे होते. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे. 

‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ सीरियल आणि ‘3 इडियट्स’ (3 Idiots),‘केदारनाथ’ (Kedarnath),‘पानीपत’  ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात भूमिका साकरलेल्या अरुण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Myasthenia Gravis नावाच्या न्यूरोमस्कुलर दुर्मीळ आजाराने ते गेल्या अनेक दिवसांपासून पीडित होते. तब्येत बिघडल्यानंतर अरूण यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. 

टॅग्स :मुंबईहॉस्पिटलबॉलिवूड