'बॉर्डर २' च्या यशानंतर अभिनेता वरुण धवन आता त्याच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' या रोमँटिक-ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. वरुणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून निर्मात्यांनी त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून तो आता नियोजित वेळेच्या आधीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वरुणच्या चाहत्यांना आता या चित्रपटासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड धवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट आधी ५ जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ४ जून रोजी 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांनी सुरुवातीला वरुणचा चित्रपट १२ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार केला होता. पण आता ताज्या अपडेटनुसार, निर्मात्यांनी सर्वांना सरप्राईज देत हा चित्रपट मे महिन्यातच प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. आता 'है जवानी तो इश्क होना है' २२ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे वरुण धवन तिसऱ्यांदा त्याचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात वरुणसोबत दाक्षिणात्य सुंदरी पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अभिनेत्री मौनी रॉय देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ही एक धम्माल रोमँटिक कॉमेडी असणार असून चाहते या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Web Summary : Varun Dhawan's 'Hai Jawani Toh Ishq Hona Hai,' a romantic drama directed by David Dhawan, will now release on May 22, 2026, earlier than its initially planned June release. The film stars Pooja Hegde and Mrunal Thakur.
Web Summary : वरुण धवन की रोमांटिक ड्रामा फिल्म 'है जवानी तो इश्क होना है', जिसका निर्देशन डेविड धवन ने किया है, अब पहले घोषित जून की रिलीज से पहले, 22 मई, 2026 को रिलीज होगी। फिल्म में पूजा हेगड़े और मृणाल ठाकुर हैं।