वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) बहुप्रतिक्षित 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांचीही जोडी आहे. ट्रेलर बघून वरुण धवनचं पुन्हा कॉमेडी भूमिकेत दमदार कमबॅक झाल्याची प्रतिक्रिया येत आहे. तसंच जान्हवीसोबतची त्याची केमिस्ट्रीही इंटरेस्टिंग वाटत आहे. शशांक खेतानच्याच 'हंप्टी शर्मा ही दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमातून वरण धवनने मन जिंकलं होतं. आता याही सिनेमातून वरुण धवन त्याच अंदाजात परत आला आहे.
ट्रेलरमधून एकूणच सिनेमाच्या कथेचा अंदाज येत आहे. वरुण धवन सनी आणि जान्हवी तुलसीच्या भूमिकेत आहे. तर सान्या मल्होत्रा अनन्या आणि रोहित सराफ विक्रम आहे. सनीला अनन्या आणि तुलसीला विक्रम आवडत असतो. मात्र अचानक विक्रम आणि अनन्याच एकमेकांच्या प्रेमात पडतात. यामुळे सनी आणि तुलसीला ईर्ष्या वाटते. आपापल्या पार्टनर्सला जळवण्यासाठी ते एकत्र येण्याचं नाटक करतात. मात्र शेवटी सनी आणि तुलसीच प्रेमात पडतात अशी ही इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे. वरुण धवनची कॉमेडी ट्रेलरमध्ये जान आणत आहे हे मात्र खरं. एकंदर या चौघांचं गुंतागुंतीचं नातं पाहायला मिळत आहे.
ट्रेलर पाहून चाहते सिनेमा पाहण्यासाठी खूप आतुर झाले आहेत. 'वरुण धवन बॅक इन हिस प्राईम मोड', 'वरुण-जान्हवीची केमिस्ट्री मस्त' 'ब्लॉकबस्टर ट्रेलर, सिनेमाही सुपरहिट होणार', 'स्टोरी इंटरेस्टिंग आहे' अशा प्रतिक्रिया ट्रेलरवर आल्या आहेत. हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. तसंच याच दिवशी 'कांतारा चॅप्टर १'ही रिलीज होतोय. दोघंही बॉक्सऑफिसवर भिडणार आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स अंतर्गत सिनेमाची निर्मिती झाली आहे.