Join us

जान्हवी कपूरशी महिनाभर बोलला नव्हता वरुण धवन, नेमकं कारण काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 13:29 IST

वरुण धवन सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.

वरुण धवन हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. वरुण आणि  दिवंगत सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर चांगले मित्र आहेत. 'बवाल' या सिनेमात दोघे एकत्र दिसले होते. या चित्रपटादरम्याचा एक मजेशीर किस्सा चर्चेत आला आहे.  'बवाल'मध्ये काम करण्यापूर्वी जवळपास महिनाभर तो जान्हवी कपूरशी बोलला नव्हता.

 Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत वरुण धवनने सांगितले की, 'बवाल' चित्रपटासाठी मी जान्हवी कपूरशी महिनाभर बोललो नाही. चित्रपटातील पात्रांमधील केमिस्ट्री वाढवण्यासाठी मी जान्हवीपासून अंतर राखले होते'. पुढे तो म्हणाला, 'सुरुवातीला, आम्ही दोघे जेव्हा सेटवर गेलो. तेव्हा किमान पहिला महिना मी हा प्रयत्न केला.  जान्हवी सोडून सगळ्यांशी मी मुद्दाम बोलायचो'.

वरुण म्हणाला,  'ऑफ कॅमेराही जर आम्ही बोललो नाही. तर सिनेमातही ते दृश्य अधिक वास्तविक आणि भावनिक दिसेल. मला वाटले की असे केल्याने नैसर्गिक भाव पात्रांमध्ये येतील. कॅमेऱ्यासमोर पात्र अगदी खरी वाटतील म्हणून तसे केले. नितेश सरांना हे माहिती होते. तर 20 दिवसांनी मी तिला हे सांगितले. नाहीतर तिने ते वैयक्तिकरित्या घेतले असते'. 

'बवाल'हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. नाट्य, रोमान्स आणि इमोशन्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळते. 'बवाल' या सिनेमाचं कथानक वरुण धवन म्हणजेच अजय दीक्षित उर्फ अज्जू भैय्या जान्हवी कपूर म्हणजेच निशा या दोघांभोवती फिरणारा आहे. ज्याचे दिग्दर्शन नितीश तिवारी यांनी केले आहे.

टॅग्स :वरूण धवनजान्हवी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी