काल भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात क्रिकेट विश्वचषक T 20 मध्ये सेमी फायनलचा सामना रंगला. या सामन्यात भारताने बाजी मारलेली दिसली. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना उत्कंठावर्धक झाला होता. परंतु भारताने अखेर इंग्लंडच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. हा सामना पाहायला क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांपासून बॉलिवूडसेलिब्रिटी आले होते. सामना संपल्यावर मात्र अभिनेता वरुण धवन चांगलाच चिडलेला दिसला. काय घडलं नेमकं?
वरुण धवनचा राग अनावर, कारण...भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट विश्वचषक T 20 सेमी फायनल बघायला वरुण धवन स्टेडियममध्ये उपस्थित होता. वरुणची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. सामना संपल्यावर वरुण त्याच्या गाडीत बसून घरी जाण्याच्या विचारात होता त्यावेळी स्टेडियमबाहेर त्याला चाहत्यांनी चांगलंच घेरलं. चाहत्यांनी वरुणभोवती गराडा घातला. अनेक चाहते वरुण धवनच्या अगदी जवळ येऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वरुणला नीट चालता येत नव्हतं. त्याने चिडून एका चाहत्याच्या मोबाईलवर फटकाही मारला.
Web Summary : India won the semi-final against England. Actor Varun Dhawan got angry after fans mobbed him outside the stadium, making it difficult for him to move.
Web Summary : भारत ने इंग्लैंड के खिलाफ सेमीफाइनल जीता। स्टेडियम के बाहर प्रशंसकों की भीड़ ने अभिनेता वरुण धवन को घेर लिया, जिससे उन्हें चलने में मुश्किल हुई, इसलिए वह नाराज़ हो गए।