Join us

पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:44 IST

पुण्याच्या वाहतुक कोंडीत जायला लागू नये म्हणून या दोन अभिनेत्यांनी मेट्रोतून प्रवास केला.

पुणे शहरातील वाहतुक कोंडीचा फटका सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही बसतो. म्हणूनच अनेक वेळा मेट्रो कामी येते. काही मिनिटात हवं त्या ठिकाणी पोहोचता येतं. नुकतंच दोन बॉलिवूड अभिनेत्यांनाही मेट्रोतून प्रवास केला. पुदोन प्रसिद्ध अभिनेते नळ स्टॉप स्टेशनवर आले. मेट्रोनेच प्रवास करत त्यांनी हॉटेल गाठलं. काही पुणेकरांनी त्याला ओळखलंच नाही कारण त्याने मास्क लावला होता. कोण आहे हा अभिनेता?

पुण्याच्या वाहतुक कोंडीत जायला लागू नये म्हणून या दोन अभिनेत्यांनी मेट्रोतून प्रवास केला. सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने (Ahan Shetty) इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. अहान आणि सर्वांचा लाडका अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. व्हिडिओत वरुण धवन म्हणतोय, "आम्ही सध्या पुण्यात आहोत आणि हरवलो आहोत. मी आणि अहान आता मेट्रोतून प्रवास करणार आहे आणि आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे."

आषाढी वारीमुळे पुण्यातील अनेक रस्ते बंद आहेत. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्यांनाही मेट्रोतूनच प्रवास केला. या प्रवासाची झलक त्यांनी मेट्रोतून दाखवली आहे. वरुणने तोंडाला मास्क लावलेला आहे. गर्दी असल्याने त्यांनी मध्येच उभं राहूनही प्रवास केला. आतमध्ये वरुण आहे जसं जसं लोकांना कळत गेलं त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दीही केलेली दिसत आहे.

वरुण धवन आणि अहान शेट्टी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमी येथे 'बॉर्डर २'च्या शूटिंगसाठी आले होते. काही दिवसांपूर्वीच 'बॉर्डर २'च्या स्टारकास्टचा एकत्रित फोटो समोर आला होता. वरुण आणि अहान यांच्याशिवाय सिनेमात सनी देओल, दिलजीत दोसांझ यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :वरूण धवनअहान शेट्टीपुणेमेट्रोबॉलिवूड