'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) सिनेमाची खूप चर्चा आहे. रणवीर सिंगची भूमिका असलेला हा सिनेमा अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं होतं. 'धुरंधर २' मध्ये छोटी भूमिका केलेल्या कलाकारालाही सध्या चांगली लोकप्रियता मिळतेय. परंतु एका अभिनेत्याने ''माझे सर्व सीन कापले'', असा आरोप करत दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं?अभिनेता सैफीने 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सैफीने व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, ''तुम्ही सर्वांनी माझा धुरंधर २ हा सिनेमा बघितला असेल. ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही, त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य धर यांची माझ्याशी काय दुश्मनी आहे मला माहित नाही. या सिनेमात माझे एकूण ६ सीन्स होते परंतु हे सर्व सीन्स कट करण्यात आले आहेत.''मी दिग्दर्शकाला इतकंच सांगू इच्छितो, मी चंद्रिकासोबत व्हिडीओ बनवतो ही गोष्ट तुम्हाला चुकीची वाटत असेल तर त्यासाठी माझे सीन डिलीट करुन काय साध्य होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, एका गाण्यात बॅकग्राऊंडला माझा आवाज ऐकू येतो. बाजीगर ओ बाजीगर गाण्याच्या वेळी माझा आवाज ऐकू येतो. जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा सर्व गोष्टी सुरळित होत्या.
सैफीने म्हटले की, दिग्दर्शकालाच एक गोष्ट सांगू इच्छितो की ठीक आहे, तुम्हाला जर माझे काही सीन कापायचे होते, माझ्याशी काही वैयक्तिक दुष्मनी होती, किंवा चंद्रिकासोबत मला बघून जर तुम्हाला असे वाटू लागले की हा चंद्रिकासोबत प्रसिद्ध होत आहे, आणि मी याचे सीन कापून टाकीन, तर काळजी करू नका, मी आणि चंद्रिका खूप मोठ्या स्तरावर काम करू."
अशाप्रकारे सैफीने त्याच्या मनातली खदखद व्यक्त केली. सैफी सध्या 'वडापाव गर्ल' चंद्रिकामुळे चर्चेत आला आहे. चंद्रिका आणि सैफीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे.
Web Summary : Actor Saifi alleges director Aditya Dhar cut his scenes from 'Dhurandhar 2'. Saifi claims six scenes, including ones with Ranveer Singh and Sanjay Dutt, were removed. He suspects jealousy over his association with Chandrika, the 'Vadapav Girl', as the reason.
Web Summary : अभिनेता सैफी ने निर्देशक आदित्य धर पर 'धुरंधर 2' से उनके दृश्य काटने का आरोप लगाया। सैफी का दावा है कि रणवीर सिंह और संजय दत्त के साथ वाले छह दृश्य हटा दिए गए। उन्हें 'वड़ापाव गर्ल' चंद्रिका से ईर्ष्या होने का संदेह है।